Robbery at Gun point News esakal
नाशिक

Nashik Crime News : बंदुकीच्या धाकाने घेतले 5 लाखांचे दागिने

नरेश हाळणोर

नाशिक : मौजमजा करीत व्यसनाच्या आहारी गेलेल्या संशयित युवकाने एका अल्पवयीन मुलांची आर्थिक परिस्थिती हेरून त्यास बंदुकीतून गोळी झाडून ठार मारण्याची धमकी देत त्यास घरातील सुमारे पाच लाखांचे दागिने आणण्यास भाग पाडले. याप्रकरणी संशयित युवकाविरुद्ध बळजबरीने खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jewellery worth 5 lakhs taken at gunpoint Nashik Latest Crime News)

अथर्व देशमुख (रा. आनंदवली, गंगापूर रोड), असे भाईगिरी करणाऱ्या संशयित युवकाचे नाव असून, रोलेट बिंगोचा नाद व व्यसनाच्या आहारी तो गेला आहे. संशयित अथर्व याने अनेक शालेय मुलांकडून बंदुकीचा धाक दाखवून त्या मुलांना त्यांच्याच घरात चोरी करण्यास भाग पाडल्याचे समोर येते आहे. एका पालकाच्या फिर्यादीनुसार, १५ वर्षीय मुलालाही संशयित अथर्व याने बंदुकीतून गोळी मारून ठार मारण्याची धमकी देत घरातून वेळोवेळी चोरी करण्यास भाग पाडले.

भेदरलेल्या पटेल यांच्या मुलाने घरातल्या तिजोरीतील चोरून आणलेले ४ लाख ९५ हजार रुपयांचे दागिने संशयित अथर्व यास कॉलेज रोड परिसरात एका खासगी क्लास तर कधी माणिकनगर येथील शिवसत्य ग्राउंड येथे बोलावून दिले आहेत. सदरचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने संशयित अथर्व याने अनेक मुलांना अशाचप्रकारे धमकी देत त्यांच्याकडून बळजबरीने खंडणी वसुली केल्याचे येते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: OUT or NOT OUT? ध्रुव जुरेलचा वादग्रस्त झेल; श्रीलंकन संघ करणार तक्रार... गॉलवर वेगळाच राडा Video Viral

Marathi News Live Updates : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचा आढावा

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

SCROLL FOR NEXT