old mother.jpg 
नाशिक

पुढे खून झाल्याचे सांगत तोतया पोलीसांनी वृध्देला लावला चुना! चक्क चौदा हजारांचे दागिने लांबविले 

हर्षवर्धन बोराडे

नाशिक रोड : वृध्द महिला दुपारी साडेबाराच्या सुमारास रोडवरून एकट्या घरी जात होत्या. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना थांबविले, आम्ही पोलिस असून, पुढे खून झाला आहे. त्यामुळे तुम्ही लवकर घरी जा असे त्यांनी सांगितले...अन् मग... 

असा घडला प्रकार

बेबीताई सुभाष सोनवणे (जाचक मळा, जय भवानी रोड, नाशिक रोड) रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जय भवानी रोडवरील सुमन हॉस्पिटल येथून एकट्या घरी जात होत्या. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी बेबीताई यांना थांबवून, आम्ही पोलिस असून, पुढे खून झाला आहे. त्यामुळे तुम्ही लवकर घरी जा तसेच अंगावरील सोन्याचे दागिने कागदात गुंडाळून पाकिटात ठेवा, असा सल्लाही दिला. बेबीताई या सोन्याची पोत, कर्णफुले असा १३ हजार ७५० रुपयांचे सोन्याचे दागिने कागदात गुंडाळून पाकिटात ठेवत असताना दोन्ही भामट्यांनी हातचलाखीने ते दागिने चोरून नेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बेबीताई यांनी उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली.  -

पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा

पुढे खून झाला असल्याचे सांगत दुचाकीवर आलेल्या दोन तोतया पोलिसांनी वृद्धेला लुबाडल्याचा प्रकार नाशिक रोडच्या जय भवानी रोड येथे रविवारी (ता.२६) उघडकीस आला. महिलेचे चौदा हजारांचे दागिने भामट्यांनी हातचलाखीने लांबवले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

Talegaon Station News : १०० मीटरचे काम, वाहतूक मात्र दिवसभर जाम; चाकण एमआयडीसीतील भांबोली ते चाकण रस्त्यावर वाहतूक कोंडीचा शुक्रवार

GT vs RR Qualifier 2: वैभव सूर्यवंशीचे शतक थोडक्यासाठी हुकले... पठ्ठ्याने ५ विश्वविक्रमांसह राजस्थानला सावरले, गुजरातसमोर तगडे लक्ष्य

GT vs RR Qualifier 2: वैभव सूर्यवंशीचे ३ वर्ल्ड रेकॉर्ड्स! आंद्रे रसेलच्या नावावर असेलला विक्रम उद्ध्वस्त; जगात अव्वल नंबर कामगिरी...

Kaygaon News : ‘शेतकऱ्यांना न्याय द्या, रेकॉर्ड पारदर्शक तपासा’; जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे अधिकाऱ्यांना सक्त निर्देश

SCROLL FOR NEXT