Jindal Fire Accident Company esakal
नाशिक

Jindal Fire Accident : जिंदाल घटनेचा उच्चस्तरीय समितीकडून आढावा

सकाळ वृत्तसेवा

घोटी : जिंदाल कंपनी येथे एक जानेवारी दरम्यान जीवित व वित्तहानी झाली होती, यावेळी मुख्यमंत्री, पालकमंत्री, कामगार मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदींसह शासनस्तरावरून वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली होती. यावेळी घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक करण्यात येऊन शासनास अहवाल पाठवण्यासाठी सूचित करण्यात आले होते.

जिंदाल विश्रामगृह येथे समितीच्या वतीने नागरिकांना आपल्या तक्रारी असल्यास लेखी मागणी करण्यात आली होती, त्यानुसार मुंढेगाव ग्रामपंचायत सरपंच मंगल गतीर यांसह सदस्य यांनी स्थानिकांना रोजगार, कामगारांना उच्च दर्जाचे सुरक्षा साहित्य द्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या. (Jindal Fire Accident Update Review of Jindal incident by high level committee Nashik News)

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

कंपनी ठेकेदार, व्यवस्थापन यांच्याकडून समितीने लेखी जबाब घेत माहिती जाणून घेतली. कामगार सुरक्षिततेच्या दृष्टीने देण्यात येत असलेली साहित्य दर्जेदार आहे का, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे का, कामगारांचे हमी पत्र, यादी व अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात येणार असल्याची माहिती समिती पदाधिकारी यांच्याकडून देणयात आली.

अप्पर जिल्हाधिकारी पारधी, उच्चस्तरीय समिती सदस्य सचिव अंजली आडे, कामगार उपायुक्त विकास माळी, विद्युत निरीक्षक हेमंत उगले, तहसीलदार परमेश्वर कासुळे, सहायक निरीक्षक दिलीप खेडकर यांसह कंपनी व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.

माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी कमिटीस दिलेल्या निवेदनात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना कंपनी व्यवस्थापनाने दिलेली माहिती चुकीची, कंपनीत अनेक कामगार अधिकृतरीत्या नाही, आगीस जबाबदार व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ठेकेदार पद्धतीने परप्रांतीयांची भरतीचुकीची, कंपनीकडून मृत कामगारांना मदत द्यावी, कंपनीत स्थानिक प्रकल्प बाधितांना नोकरीत सामावून घ्यावे, सांडपाण्यामुळे जमिनी नापिक झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT