The part of Joshi Wada that collapsed on Thursday night in Dingar Ali area esakal
नाशिक

Nashik : डिंगर अळी परिसरातील जोशी वाडा कोसळला!

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : डिंगर अळी परिसरातील घर नंबर २३२२ जोशी वाडा गुरुवारी (ता. २०) रात्री नऊला कोसळला. अनेक वर्षापासून वाडा बंद असल्याने वाड्यात कुणीही राहत नव्हते. परंतु, वाडा परिसरात रस्त्यावर खेळणारे दोन चिमुकले थोडक्यात बचावले. वाड्यास लागून असलेल्या रस्त्यावर दोन लहान मुले खेळत होती. वाड्याची माती पडत असल्याचे लक्षात आल्याने दोघांनी तेथून पळ काढताच क्षणात वाडा कोसळला. त्यामुळे दोघेही थोडक्यात बचावले. (Joshi Wada collapsed in Dingar Ali area Nashik Latest Marathi News)

महापालिका पश्चिम विभाग कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच अरुण मोरे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रस्त्यावर पडलेला वाड्याचा काही प्रमाणात मलबा बाजूला केला. रात्रीमुळे अरुंद भागात जेसीबी घटनास्थळी जाणे शक्य नसल्याने कामात अडचण येत होती. त्यामुळे रस्त्यावरील पूर्ण मलबा उचलणे कर्मचाऱ्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे मलबा हटविण्याचे काम थांबविले. याशिवाय वाड्याचा बहुतांशी भाग धोकादायक झाला आहे. तोही भाग कोसळण्यापूर्वीच उतरवून घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT