Crime Caught in CCTV esakal
नाशिक

मालेगावी कलंत्री भारत गॅस एजन्सीत पिस्तुल, चाकूच्या धाकाने लाखाची लुट

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील मालेगाव - सटाणा रस्त्यावरील सोयगाव फाट्यावरील कलंत्री भारत गॅस एजन्सीत पिस्तुल, चाकूचा धाक दाखवून दोघा लुटारूंनी लाखाची लुट केली. दुकानात असलेल्या चौघा कर्मचाऱ्यांना पिस्तुलची दहशत दाखवून दुकानात शिरून केलेल्या या जबरी लुटीमुळे खळबळ उडाली आहे. सोमवारी (ता.१९) सायंकाळी हा प्रकार घडला. (Kalantri Bharat Gas Agency looted with pistol knife worth lakhs nashik Latest Marathi News)

सोयगाव फाट्यावरील कलंत्री गॅस एजन्सीत ट्रॅकसुट व चेहरा झाकण्यासाठीची टोपी परिधान करून दुचाकीवरून दोन लुटारू आले. त्यांनी चौघा कर्मचाऱ्यांना पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून खाली बसविले. एकाने त्यांच्यावर पिस्तुल रोखत लक्ष ठेवले. यावेळेत दुसऱ्या लुटारूने ड्रावर मध्ये जमा असलेली एक लाख ५८० रूपये जबरीने लुटून फरार झाले.

लुटारू मराठी भाषेत दमबाजी करत होते. त्यावरून ते स्थानिक व माहितगार असल्याचा संशय आहे. हा सर्व थरार सिसिटीव्हीत कैद झाला आहे. एजन्सीतील संगणक चालक अजय बाबाजी गोरे ( २८, रा. श्रीरामनगर) याच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात जबरी लुटीचा व शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे वृत्त समजताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखा व विशेष पथकाने भेट देत पाहणी केली. पोलिस संशयीतांच्या शोधासाठी सिसिटीव्हीची बारकाईने पाहणी करीत आहे. गेल्या आठवड्यात पाच घरफोडींचे प्रकार घडले. मोबाईल व रस्ता लुट पाठोपाठ थेट दुकानात शिरून लुटण्याचा प्रकार घडल्याने गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढले आहे. पोलिसांनी त्यांच्या नांग्या वेळीच ठेचण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

Chhagan Bhujbal: काल 'ओबीसी'च्या मंचावर, आज नाराजीचा सूर! वडेट्टीवारांच्या व्हिडीओवरुन भुजबळांना सुनावले खडेबोल

Barshi Crime : "संबंध ठेवले नाही तर गुन्हा दाखल करीन"; विवाहित शेतकऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर अखेर गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT