Kalhai business is on the verge of closure nashik marathi news 
नाशिक

कल्हई लावणारे शेवटचे शिलेदार! याकूबचाचा वयाच्या ७२ व्या वर्षीही देतात गावोगाव सेवा 

किरण सूर्यवंशी

अभोणा (जि.नाशिक) : ग्रामीण भागातील बरेचसे व्यवसाय बदलत्या जीवनशैलीनुसार काळाच्या ओघात हद्दपार होत आहेत. त्यातीलच एक तांब्या-पितळीच्या भांड्यांवर कल्हईचा व्यवसायही मागे पडला आहे. अशातही वयाच्या बहात्तरीत असलेले सटाण्याचे याकूबचाचा शेख गावोगाव फिरून भांड्यांना कल्हई लावून आपला उदरनिर्वाह करत आहेत. 

फोनवर बोलावणं येत अन् चाचा पोहचतात

गेल्या तीन पिढ्यांपासून ते हा व्यवसाय करीत आहेत. मात्र या पिढीतील ते शेवटचे शिलेदार असावेत. हात काळे करून चटके सहन करण्याची तयारी नसल्याने या व्यवसायातील वारसदार पुढे आले नाहीत. याकूबचाचा सटाणा येथील जावई आरिफ बेग यांच्या मदतीने रिक्षामध्ये कल्हईसाठी कोळसा, कथिल, नवसारी पावडर, कोळसाभट्टी यंत्र बरोबर घेऊन विविध गावांतून संपर्क क्रमांकावर फोन आल्यावर त्या गावात जातात. परिसरातील महिला आपल्या अडगळीत पडलेल्या तांबे, पितळीची भांडे कल्हई करून घेतात. सर्व खर्च वजा करून मिळालेल्या उत्पन्नात कुटुंबाची बऱ्यापैकी गुजराण होते. 

व्यवसाय हद्दपार होण्याच्या स्थितीत

स्टेनलेस स्टील व प्लॅस्टिकच्या भांड्यांची क्रेझ असलेल्या सध्याच्या जमान्यात तांबे- पितळीची भांडी इतिहासजमा झालीत. किमतीने महाग व नियमित साफसफाईसाठी गृहिणींना ही भांडी तापदायक असल्याने तांबे-पितळीची परात, पातेले, कळशी, हंडा व ताट-तांबे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामीण भागात पितळाचे मोठे पातेले फक्त उन्हाळ्यात वाळवणीचे पीठ चुलीवर शिजविण्यापुरतेच राहिले आहे. त्यामुळे ही भांडी कल्हई करून देणारा व्यवसायही हद्दपार होण्याच्या स्थितीत आहे. मात्र मूळचे चाळीसगाव येथील रहिवासी व हल्ली सटाणा येथे स्थायिक ७२ वर्षीय याकूबचाचा आजही बागलाण, देवळा, कळवण, चांदवड परिसरातील विविध गावांत कल्हई व्यवसायाची सेवा देत आहेत. 

तांब्या-पितळीची भांडी हल्ली कुणीही वापरत नाहीत. ही भांडी खूप महाग व नियमित सफाईसाठी कठीण असल्याने वजनाला हलक्या स्टेनलेस स्टील व प्लॅस्टिकच्या भांड्यांकडे जास्त कल आहे. त्यामुळे कल्हईचा आमचा पिढीजात व्यवसाय बंद होण्याच्या स्थितीत आला आहे. लोकांच्या आवडी बदलल्याने नवीन पिढीही या व्यवसायात उतरत नाही. वयोवृद्ध कारागिरांना शासनाने आर्थिक मदत करावी. 
-याकूब शेख (चाचा), कल्हई कारागीर, सटाणा 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

SCROLL FOR NEXT