Kalidas Kala Mandir esakal
नाशिक

Kalidas Kala Mandir : ‘कालिदास’चे डिपॉझिट NMCडून ‘जप्त’? नाट्यसंस्थांची 2019 पासून अडकली अनामत

सकाळ वृत्तसेवा

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकचे कलावैभव असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिरात नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी महापालिकेकडे अनामत रक्कम भरलेल्या नाट्यसंस्थांचे लाखो रुपये अडकले आहेत. किमान २०१९ पासून भरलेली अनामत रक्कम तरी परत मिळावी म्हणून महापालिकेत चकरा मारुन नाट्यसंस्था प्रमुखांच्या चप्पला झिजल्या; परंतु, त्यांना अद्याप दाद मिळालेली नाही.

अनामत रकमेची फाइल अगदी कासवगतीने पुढे सरकत असल्यामुळे हे ‘डिपॉझिट’ महापालिकेने जप्त केले की काय, अशी शंका या नाट्यसंस्था चालकांना वाटू लागली आहे. (Kalidas kala mandir deposit confiscated by NMC deposit of theater institutions been stuck since 2019 nashik news)

जयप्रकाश जातेगावकर यांचे फ्रेंड सर्कल व राजेंद्र जाधव यांचे नाट्यसेवा संस्था आहेत. या दोन संस्थेचे प्रत्येकी सात लाख रुपये अनामत रक्कम महापालिकेकडे अडकली आहे. त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप त्यांना दाद मिळालेली नाही.

महापालिकेने २०१९ मध्ये कालिदास कलामंदिरचे बुकिंग ऑनलाइन स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या संस्थांनी १० हजार, २० हजार, ३० हजार अशा स्वरूपात अनामत रक्कम महापालिकेकडे जमा केली. नियमानुसार नाटक किंवा इतर कार्यक्रम संपल्यानंतर शक्य तेवढ्या लवकर ही अनामत रक्कम या संस्थांना परत करणे बंधनकारक आहे.

परंतु, महापालिकेचा मिळकत विभागाने अद्याप ही अनामत रक्कम परत केलेली नाही. ही कैफियत फक्त दोनच संस्थांची आहे असे नाही तर या दोन संस्थांची रक्कम मोठी असल्यामुळे त्यांचा दाखला दिलेला आहे. काही संस्थांना तर २००० सालापासून अनामत मिळालेली नाही. त्यांनी पाठपुरावा करणेच सोडून दिले आहे.

महापालिका या संस्थांना अनामत रक्कम परत करण्यास इतका विलंब का लावते, याचे कोडे अजूनही या संस्थांना उलगडलेले नाही. विशेष म्हणजे या विषयासंदर्भात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनीही अनेकदा पाठपुरावा केला. पण महापालिकेने त्यांनाही दाद लागू दिलेली नाही.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

पुन्हा ऑनलाइन बुकिंगचा घाट

कालिदास कलामंदिरचे २०१९ मध्ये बुकिंग ऑनलाइन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्याच काळातील अनामत रक्कम अद्याप नाट्यसंस्थांना मिळालेली नाही. अशा परिस्थितीत कालिदासचे बुकिंग पुन्हा ऑनलाइन करण्याचा घाट महापालिकेने घातला आहे.

मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्येही नाट्यगृहांचे बुकिंग ऑफलाइन पद्धतीनेच होते, तर नाशिकमध्येच ऑनलाइनचा आग्रह का, असा प्रश्न नाट्यसंस्थांनी उपस्थित केला आहे.

या संस्थांचे अडकले पैसे

फ्रेंड सर्कल : ७ लाख रुपये

नाट्यसेवा संस्था : ७ लाख रुपये

वन्स मोअर : ३५ हजार रुपये

सुनील परमार : ३५ हजार रुपये

"अनामत रक्कम मिळवण्यासाठी महापालिकेकडे अनेकदा हात पसरवले. पण कोणीच दाद देत नाही. तीन वेळा आयुक्तांची बदली झाली. नवीन आयुक्तांसमोर विषय नव्याने मांडावा लागतो. हाती काही लागतच नाही. आमच्या हक्काचे पैसेही आम्हाला वारंवार मागावे लागतात, हे दुर्दैव आहे." - राजेंद्र जाधव, नाट्यसेवा संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

India Cricket Team: अजित आगरकर, गौतम गंभीरचा 'सिक्रेट प्लान'! रोहित शर्मा, विराट कोहली लवकरच होणार माजी खेळाडू

Crime: पैसे परत कर नाहीतर...; प्रेयसीची धमकी, ५० वर्षीय प्रियकर संतापला, रागाच्या भरात २ मुलांसह महिलेसोबत धक्कादायक कृत्य

सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

IND vs PAK : भारताच्या 'पोरींना' दिला त्रास, ICC ने उतरवला माज! पाकिस्तानच्या खेळाडूवर कारवाई

SCROLL FOR NEXT