CIDCO : Broken guard wall of Kalika Park esakal
नाशिक

Nashik News : आम्ही खेळायचं कुठं? कालिका पार्क उद्यानाला अवकळा

सकाळ वृत्तसेवा

सिडको : सिडको परिसरातील कालिका पार्क उद्यानाची दुरवस्था झालेली असून, उद्यानातील काही खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहे. उद्यानात मोठ्या प्रमाणावर कचरा गोळा झाला असून, येथे घंटागाडी वेळेवर जात नसल्याने येथे अस्वछता पसरल्याचे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे.

उद्यानात प्रेमीयुगुल सकाळ सुमारास ठाण मांडून बसलेले असून रात्री मद्यपी उद्यानावर ताबा घेत असतात. (Kalika Park problems ignored by municipal corporation nashik news)

यामुळे उद्यान परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट असून, स्थानिक पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. उद्यानाचे मुख्य द्वार नेहमीच बंद असल्याने उद्यानात दुसऱ्या गेट ने नागरिकांना ये- जा करावी लागत असते.

उद्यानाच्या संरक्षण भिंती अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत आहेत. तर येथे मोठ्या प्रमाणावर घूस, उंदीर असून काही प्राणी उद्यानाच्या आवारात मरण पावलेले असल्याने येथे दुर्गंधी पसरलेली पाहावयास मिळते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, आरोग्य विभागानेदेखील येथे लक्ष देणे गरजेचे आहे.

कालिका पार्क उद्यान

* कचऱ्याचे साम्राज्य

* घंटागाडीचे येत नसल्याचा आरोप

* तुटलेल्या खेळणी दुरुस्तीचे काम होत नाही.

* उद्यानात मद्यपींचा वावर, स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष

* उद्यानात प्रेमीयुगुलांचा वावर

* उद्यानात विषारी प्राणी, उंदीर घूस मोठ्या प्रमाणावर

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

"उद्यानात सकाळ, सायंकाळ प्रेमियुगुलांचा वावर असून, लहान मुलांना येथे खेळण्यास कसे आणावे असा प्रश्न उपस्थित राहत आहे. प्रेमीयुगुलांवर कारवाई करायला हवी."

- कल्याणी थोरात, गृहिणी

"उद्यानात मोठ्या प्रमाणावर कचरा असून हा अनेक महिन्यांपासून येथून उचलून नेण्याची तसदी घंटागाडी कर्मचारी घेत नसल्याने येथे यामुळे उंदीर व घुशींचे प्रमाण वाढले आहे. तर उद्यान परिसरात विषारी प्राणीदेखील पाहावयास मिळत असतात."

- संजना कोळी, गृहिणी

"उद्यानाच्या आवारात रात्री मद्यपींनी ताबा घेतलेला असतो. त्यांच्यामुळे उद्यानात जाण्यास भीती वाटत असून, स्थानिक पोलिस प्रशासन यावर कारवाई कधी करणार?"

- लता जोशी, गृहिणी

"उद्यानामध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकदेखील विरंगुळ्यासाठी येत असतात. मात्र, उद्यानातील विविध समस्यांमुळे अनेकांनी या उद्यानाचा वापरच बंद करून टाकला असून येथील समस्या त्वरित सोडवाव्यात."

- वृंदा गवळी, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT