Kalwan Mayor Kautik Pagar, Govardhan Bairagi and dignitaries while felicitating Mayur Bairagi.  esakal
नाशिक

Success Story : कळवणचा मयूर बैरागी CA परीक्षा उर्त्तीण! वडिलांच्या कष्टाचे चीज केल्याचे समाधान

सकाळ वृत्तसेवा

कळवण (जि. नाशिक) : जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर कळवण येथील मयूर गोवर्धनदास बैरागी याने सीए अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे. (Kalwan Mayur Bairagi Passed CA Exam satisfaction of work Success Story nashik news)

दहावीत ८९ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्या मयूर बैरागी (वय २५) याने अभियंता व डॉक्टर या करियरच्या वाटा निवडत असताना वडील गोवर्धनदास बैरागी यांच्या एका शब्दाखातर सीए होण्याचा निर्धार केला. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या सीए फायनल परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्याने यशाला गवसणी घालत आपले ध्येय पूर्ण केले.

मूळचे करंजवन (ता. दिंडोरी) येथील बैरागी हे शेतकरी कुटुंब मयुरचे वडील गोवर्धनदास हे नोकरीनिमित्त कळवण येथे स्थलांतरित झाले. मयूर याने कळवण येथील मराठी माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत चांगले गुण मिळवले होते. अकरावीत असताना वडिलांनी सीए होण्याचा पर्याय सुचवला व त्याने ते आव्हान स्वीकारले.

त्याने नाशिक येथे अकरावी व बारावीचे व पदवीचे शिक्षण केटीएचएम महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर सीएची तयारी नाशिक येथूनच केली. सीए साठी आवश्‍यक तिन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. या दरम्यान कोविडची मोठी साथ आली, परंतु त्याला न डगमगता मयूरने त्याच्या ध्येयाला पर्याय ठेवला नाही.

परीक्षेत काही वेळेस अपयश आले मात्र अशा वेळेस कुटुंबाने भक्कम पाठिंबा दिल्याने मयूर हे यश प्राप्त करू शकला. मयूर यास कुटुंबासह सीए प्रकाश सामंत, सीए सतीश बर्वे, सीए दर्शन चंडालीया, सीए अनुराग यादव व त्यांचे सहकारी तसेच आर. के. एम. शिक्षकवृंद आणि के. टी. एच. एम. महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

मयूरच्या या यशाबद्दल नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी मयूर बैरागी याचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, आदिवासी सेवक पांडुरंग पाटील, विष्णू बोरसे, कळवण सोसायटीचे सभापती रवींद्र पगार, मनोज देवरे, राकेश हिरे, प्रशांत गोसावी उपस्थित होते.

वडिलांच्या कष्टाचे चीझ

मयुरचे वडील गोवर्धनदास बैरागी हे राज्य परिवहन महामंडळाच्या कळवण आगारात वाहतूक नियंत्रक आहेत.मुलांनी अभ्यासात सातत्य ठेऊन यशाचे शिखर गाठावे हे त्यांचे स्वप्न मुलांनी सार्थकी ठरवल्याने वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याचे मयूरच्या यशाने सिद्ध झाले.

"कोणतेही उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नांमध्ये सातत्य असणे गरजेचे आहे. उच्च शिक्षण विभागाची निवड करताना विचारपूर्वक निवड करावी, व त्यामध्ये सातत्याने परिश्रम करणे आवश्यक आहे. सीए होण्यासाठी सर्वांनीच पाठिंबा दिल्याने मी हे यश संपादन करू शकलो."

- मयूर बैरागी, सीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT