Railway  esakal
नाशिक

Nashik News : कामयानी एक्स्प्रेसला डॉ. भारती पवारांकडून हिरवा झेंडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून कामयानी, जनता आणि कृषीनगर एक्स्प्रेसला नांदगाव रेल्वे स्थानकावर पुन्हा थांबा देण्यास मंजुरी देण्यात आल्यानंतर शनिवारी (ता.८) केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्या हस्ते कामयानी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. (Kamayani Janta and Krishinagar Express given permission to held again at Nandgaon railway station nashik news)

कोरोनामुळे नांदगाव रेल्वेस्थानकात थांबणाऱ्या झेलम, महानगरी, शालीमार, सचखंड एक्स्प्रेस, पुणे भुसावळ, कामयानी, कृषीनगर, जनता, काशी या लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेचा थांबा रद्द करण्यात आला होता. कोरोना महामारी कमी झाल्यानंतर काशी आणि महानगरी या एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत करण्यात आला होता.

मात्र इतर सर्व गाड्यांचे थांबे रेल्वे मंत्रालयाकडून पूर्ववत करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे येथील नागरिकांचा अतोनात हाल होत होते. कोरोनापूर्वी थांबा असलेल्या सर्व एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा पूर्ववत करण्यात यावा यासाठी स्थानिक नागरिकांसह, आम्ही नांदगावकर यांनी आंदोलन करत आमदार, खासदार आणि प्रशासनाला निवेदन दिले होते.

याप्रकरणी खासदार डॉ. भारती पवार, आम्ही नांदगावकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

अखेर डॉ. पवार यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि रेल्वे मंत्री यांनी कामयानी, कृषीनगर आणि जनता एक्स्प्रेसचे थांबे पुन्हा पूर्ववत करण्याचा निर्णय घेत आठ एप्रिलपासून गाड्यांना थांबे देण्यात येणार होते.

शनिवारी (ता.८) सायंकाळी नांदगाव रेल्वे स्थानकात कामायनी एक्स्प्रेसचे आगमन जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कामायनी एक्स्प्रेस फुलांनी सजविण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी हिरवा झेंडा दाखवला. या थांब्यामुळे नांदगावकरांसह तालुक्यातील व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी वर्गातर्फे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी भुसावळ विभागाचे रेल्वे अधिकारी अनिल कुमार पाठक, डिसीएम जयप्रकाश मौर्य, पी.डी.वाडेकर, बी.एल. मीना, वाणिज्य निरीक्षक, मीना, नांदगाव रेल्वे यांच्यासह अधिकारी स्टेशन प्रबंधक विश्वजित मीना, ॲड. जयश्री दौंड, सजन कवडे, गणेश शिंदे, दत्तराज छाजेड, संजय सानप, शहराध्यक्ष उमेश उगले, सुनील जाधव, भाऊराव निकम, तुषार पांडे, आम्ही नांदगावकर कृती समितीचे बबलू सय्यद, महेश जाधव, हनिफ शेख आदींसह नांदगावकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT