Actors of Deolali Kamgar Kalyan Mandal presenting scenes from the play 'Sadhu Sant Yeti Ghara'. esakal
नाशिक

Kamgar Kalyan Natya Spardha : कुंभमेळ्यातील कहाणी ‘साधू संत येती घरा’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कुंभमेळ्यातील पर्वणीची गमतीदार कहाणी सांगणारी नाट्यकृती ‘साधू संत येती घरा’. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६८ व्या नाट्य स्पर्धेत रविवारी (ता. १५) कामगार कल्याण केंद्र देवळालीगावतर्फे हे नाटक सादर झाले. राजेंद्र जव्हेरी लिखित या नाटकाचे दिग्दर्शन सुनील गायकवाड यांनी केले. (Kamgar Kalyan Natya Spardha Kumbh Mela Story Saadhu Sant Yeti Ghara nashik news)

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीसाठी आलेले दांपत्य सुरेखा आणि केशव राहण्यासाठी जागा शोधतात. त्यात त्यांना प्रशांत आणि प्रांजल यांच्या घराबद्दल कळते, तेथे सुरेखा आणि केशव मावशी आणि काका आहोत असे सांगून प्रवेश करतात.

मात्र, त्या घराचा घरमालक अत्यंत कडक स्वभावाचा असतो. त्याला कोणीही तिऱ्हाईत व्यक्ती घरात नको असतो. मात्र, या सर्वांतून सुरेखा आणि केशव या मावशी काकांची साधू आणि साध्वीत होणाऱ्या रुपांतराची गमतीदार कहाणी प्रेक्षकांपुढे उलगडत जाते.

रोहित सरवार, स्वाती कदम, सविता जोशी, सुनील गायकवाड, राजेंद्र जव्हेरी, मिलिंद चिखलीकर, अविनाश वाघ, संगीता देशमुख, विलास हांडगे, योगेश्वर थोरात, संजय पवार, मिलिंद गायकवाड, सुनीता भगत, सुरेश दरगुडे, ओम जाधव, जयप्रकाश पुरोहित, ज्ञानेश्वरी पवार, ईश्वरी पवार या कलावंतांनी या नाटकात भूमिका साकारल्या.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

नेपथ्य तुषार गायकवाड, जयप्रकाश पुरोहित यांनी, तर चैतन्य गायधनी यांनी प्रकाशयोजना साकारली. अतुल गायकवाड यांनी नाटकाला पार्श्वसंगीत दिले. पात्रांच्या रंगभूषा माणिक कानडे तर वेशभूषा अनुराधा गायकवाड यांनी साकारल्या.

अर्चना नाटकर, अर्पिता गायकवाड, अपूर्वा गायकवाड यांनी रंगमंच साहाय्य केले. पंकज देशमुख, अशोक भालेराव यांचे सहकार्य लाभले. प्रथमेश गायकवाड यांनी निर्माता म्हणून काम पाहिले.

आजचे नाटक

स्पर्धेत सोमवारी (ता. १६) कामगार कल्याण केंद्र, पिंप्राळातर्फे ‘अर्यमा उवाच’ हे नाटक सादर होणार आहे. सोमनाथ नाईक या नाटकाचे लेखक असून विशाल जाधव दिग्दर्शक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT