Pooja by Swami Samvidananda Saraswati of Kailas Math esakal
नाशिक

Pradosh Parv : कपालेश्‍वरी 5 हजार फळांसह अकराशे कमलपुष्पांची आरास

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रदोष पर्वाचे औचित्य साधत बुधवारी (ता. २४) कपालेश्‍वर मंदिरात फळ आणि फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. वेदमंत्रांच्या सुरेल व पवित्र सुरावटीवर वातावरण चैतन्यमय व भक्तीमय झाले होते. पेठ रोडवरील कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले. (Kapaleeshwar temple decoration of 1100 lotus flowers with 5000 fruits by swami savidanand saraswati on Pradosh Parv nashik news)

सध्याच्या अस्थिर काळात सर्व समाज सुखी संपन्न राहून आपसांतील सद्भाव कायम राहावा, कोरोना व अन्य नैसर्गिक आपत्तींपासून संपूर्ण जगाला मुक्ती मिळावी, यासाठी प्रदोष पर्वाचे औचित्य साधत बुधवारी कैलास मठाचे प्रमुख स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.

या वेळी हरिद्वार येथील स्वामी कामेश्‍वर पुरी, पंचमुखी हनुमान आखाड्याचे महंत भक्तिचरणदास, बाबूलालजी, रवींद्रनाथ यांच्यासह जोधपूर येथून मोठ्या संख्येने आलेले भक्तगण उपस्थित होते. हे पूजन अडीच ते तीन तास सुरू होते.

गर्दी कायम

चारही श्रावणी सोमवरी कपालेश्‍वर मंदिरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. श्रावणमास संपण्यास आता तीन दिवस शिल्लक असताना भाविकांची कपालेश्‍वरी गर्दी कायम आहे. नंदी नसलेला एकमेव शिवालय म्हणून कपालेश्‍वर महादेवाची देशभर ख्याती आहे. त्यामुळे याठिकाणी केवळ श्रावणातच नव्हे तर बारमाही भाविकांची मोठी गर्दी असते.

"जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊन सर्वजण सुखी, समाधानी रहावेत, नैसर्गिक आपत्तीपासून सर्वाचे रक्षण व्हावे, म्हणून आजच्या पूजनासह फळे व फुले कपालेश्‍वरी अर्पण करण्यात आली." - स्वामी संविदानंद सरस्वती, कैलास मठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT