esakal
नाशिक

Nashik News : कपालेश्वर, रामतीर्थाकडे जाणाऱ्या वाहनांना श्रावण मासात ‘नो-एंट्री’

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : श्रावणमासानिमित्ताने गंगाघाटावरील पुरातन कपालेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. तसेच, श्रावणातील प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी परगावचेही भाविक येत असल्याने मंदिर आणि गंगाघाटावर गर्दी होते.

त्यामुळे मंदिराकडे येणारे मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात आल्याची अधिसूचना शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे. (Kapaleshwar Ramatirtha roads are closed for vehicle in shravan nashik news)

गंगाघाटावरील पुरातन कपालेश्‍वर मंदिराकडे येण्यासाठी मालेगाव स्टॅन्ड, खांदवे सभागृह, ढिकले वाचनालय आणि सरदार चौकाकडून वाहनांसाठी येण्याचे वा जाण्याचे रस्ते आहेत. श्रावण मासानिमित्ताने भाविकांची गर्दी गंगाघाटावरील रामतीर्थ आणि कपालेश्‍वर मंदिरात होत असते.

त्यामुळे भाविक आणि तेथे येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्‍यता असते. सदर बाब गृहित धरून शहर वाहतूक पोलिस शाखेकडून उपाययोजना करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार मालेगाव स्टॅन्ड, खांदवे सभागृह, ढिकले वाचनालय व सरदार चौकाकडून येणारे मार्ग हे श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी व शनिवारी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वप्रकारच्या वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आले आहे.

श्रावणमासात २१, २८ ऑगस्ट आणि ४, ११ सप्टेंबर या प्रत्येक सोमवारी आणि १९, २६ ऑगस्ट आणि २, ९ सप्टेंबर या प्रत्येक शनिवारी हे चारही मार्ग वाहतुकीसाठी बंद राहतील, असे आदेश देतानाच, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहनही वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagannath Rathyatra : पुण्यात रविवारी भगवान जगन्नाथ रथयात्रा; मध्यभागात दुपारी एकपासून वाहतूक मार्गात बदल

Video: स्कूल व्हॅनला ट्रेनची जोराची धडक, ३ विद्यार्थ्यांसह ५ जणांचा मृत्यू; रेल्वे क्रॉसिंग ओलांडतांना दुर्दैवी अपघात

NEET-UG मध्ये 670 गुण; अतुल्या डोंगरेची AIR मध्ये 498 वी रँक

Matheran Mini Train : माथेरानची 'राणी' हायड्रोजन इंजिनवर धावणार!

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

SCROLL FOR NEXT