Kapaleshwar temple latest marathi news esakal
नाशिक

Nashik Kapaleshwar Temple : कपालेश्‍वर देवस्थान विश्‍वस्त- गुरव पुजारी वाद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Kapaleshwar Temple : कपालेश्‍वर देवस्थानच्या नवीन विश्‍वस्त मंडळाकडून वंशपरंपरागत गुरव पुजारी, ब्राह्मण यांना विश्‍वासात न घेता चुकीची कामे सुरू आहेत, असा आरोप मुख्य गुरव पुजारी पप्पू गाडे यांनी केला आहे.

दुसरीकडे जोपर्यंत परमेश्‍वर व शासनाचा विश्‍वास आहे, तोपर्यंत चांगली कामे करत जबाबदारी पार पाडणारच, अशी भूमिका देवस्थानचे अध्यक्ष मंडलेश्‍वर काळे यांनी मांडली आहे.

महादेवासमोर नंदी नसलेले देशातील एकमेव शिवालय म्हणून पंचवटीतील श्री कपालेश्‍वर महादेव मंदिराची ओळख आहे. काही महिन्यांपूर्वी धर्मदाय उपायुक्त कार्यालयाकडून नव्याने विश्‍वस्त मंडळाची नियुक्ती केली. (Kapaleshwar Temple Trustee Gurava Pujari dispute nashik news)

विश्‍वस्त मंडळाकडून मंदिराच्या जीर्णोद्धारासह न्हाणीघराची नव्याने उभारणी, मोठ्या प्रमाणावर झीज झालेल्या शिवलिंगावरील वज्रलेप, पायऱ्यांवर स्टीलचे रेलिंग, सीसीटीव्ही बसविणे अशी कामे सुरू आहेत. या कामांबाबतच पुजारी पप्पू गाडे यांचा आक्षेप असून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडताना विश्‍वस्त मंडळाकडून अनेक चुकीची कामे सुरू असल्याचा आरोप केला.

त्यात जिर्णोद्धार खर्चाचा तपशील, शिवलिंगावरील वज्रलेप, गुरव पुजारी वर्गाला विश्‍वासात न घेता मंदिरावर सीसी कॅमेरे बसविण्यासाठी सुरू असलेले ड्रिलींग, मागील बाजूला लावण्यात आलेल्या ध्वजस्तंभाबाबत आक्षेप नोंदविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत देवस्थानचे अध्यक्ष मंडलेश्‍वर काळे यांना विचारले असता, त्यांनी विश्‍वस्त मंडळाने आजवर कोणतेही चुकीचे काम केले नसून सर्वच कामे सर्वाना विश्‍वासात घेऊनच केल्याचा दावा करत जोवर शासनाचा व परमेश्‍वराचा विश्‍वास आहे, तोवर कोणी कितीही विरोध केला तरी चांगली कामे करणारच, अशी भूमिका मांडली.

ध्वजस्तंभ ईशान्य कोप-यातच

विश्‍वस्त मंडळाने कोणतीही समाधी मोडलेली नाही. नव्याने न्हाणीघराचे काम सुरू आहे. मंदिराच्या मागील ईशान्य बाजूस नव्याने ध्वजस्तंभ लावण्यात आला असून तो याबाबत शास्त्राचा अभ्यास असणाऱ्यांना विचारूनच घेतला गेल्याचे अध्यक्ष मंडलेश्‍वर काळे यांनी यांनी सांगितले.

वाद सामोपचाराने मिटावा : जानी

देवस्थानमधील विश्‍वस्त व पुजारी वर्गातील वाद सामोपचाराने मिटावा, अशी अपेक्षा कपालेश्‍वराचे भक्त व सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी मांडली. विश्‍वस्त व गुरव पुजारी वर्गाने एकत्र बसून यावर तोडगा काढल्यास वाद मिटेल, अशी अपेक्षाही श्री. जानी यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कोस्टल रोडचा दहिसर-विरारपर्यंत विस्तार होणार! मुंबईसह पर्यटकांना मोठा लाभ; काय आहे नियोजन?

AUS vs IND, T20I Series: टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा झाला दूर; ऑस्ट्रेलियन संघातून धोकादायक फलंदाज बाहेर

Latest Marathi News Live Update : पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात

Shocking News : पती दारू पिऊन झोपी जायचा, दीर दूधात नशेचा पदार्थ मिसळून अत्याचार करायचा; सासरच्या छळाची पीडितेने सांगितली आपबीती

Nashik News : ८ महिन्यांपासून आमदारांचा निधी अडकला! ‘ई-समर्थ पोर्टल’च्या चाचणीमुळे विकासकामांवर 'ब्रेक', लोकप्रतिनिधींपुढे नवा पेच

SCROLL FOR NEXT