Yatra Festival esakal
नाशिक

Nashik News : निफाड नगरीत दुमदुमला ‘येळकोट येळकोट’चा गजर

सकाळ वृत्तसेवा

निफाड : निफाडकरांचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रेच्या महान पर्वकाळावर रविवारी (ता. ५) शहरात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या वेळी भाविकांची मोठी गर्दी होती.

यात्रेनंतर खंडेराव महाराज मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती. त्यामुळे ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषणांनी निफाड नगरी दुमदुमली होती.

निफाड नगरपंचायत आणि श्री खंडेराव महाराज यात्रा कमिटीतर्फे माघ पौर्णिमेनिमित्त श्री खंडोबा महाराज यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी श्रींची महापुजा करण्यात आली. त्यानंतर कादवाकाठी खंडोबा महाराजांच्या पादुकांची पुजा करण्यात आली. त्यानंतर गंगेतुन आणलेल्या कावडीची शहरातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. (Khandoba Maharaj Yatra Celebrated on ratha saptami in niphad Bhandara is thrown freely by devotees Nashik News)

कावडीच्या मिरवणुकीने निफाडकरांचे लक्ष वेधून घेतले होते. खंडेराव मंदिरात श्रीचा कावडीच्या पाण्याने अभिषेक करण्यात आला. दुपारी देवाचे मानकरी कचेश्‍वर दुसाने यांच्या निवासस्थानापासून देव मंदिरात आणण्यात आले. त्यानंतर शहरातुन देवाच्या रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यंदाच्या रथाचे मानकरी रमेश जाधव होते.

त्यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीच्या अग्रभागी वाद्यवृंद होता. हा रथ मिरवणुकीने शिवाजी चौकात आला.

तेथे नाचणाऱ्या घोड्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शिवाजी चौकात आणल्यानंतर हा रथ बारा गाड्यांना जोडण्यात आला. बारा गाड्या पिवळ्या रंगाने रंगविण्यात आल्या होत्या. अग्रभागी पिवळ्या फुग्यांनी सजवलेला मानाचा रथ जोडण्यात आलेला होता. ट्रॅक्टरच्या सहाय्याने पिवळा भंडारा उधळण्यात आला.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

त्यामुळे संपूर्ण शिवाजी चौक पिवळाधमक झाला होता. श्री खंडेराव मंदिराचे भगत रमेश शेलार यांनी सायंकाळी शिवाजी चौकातुन खंडेरावाचा जयघोष करीत बारा गाड्या ओढल्या. या वेळी हजारो भाविकांनी खंडेराव महाराज की जय, असा जयजयकार करीत परिसर दणाणून सोडला.

श्री खंडेराव महाराज यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी, निफाडचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक या वेळी उपस्थित होते. शनिवारी (ता. ४) रात्रभर श्री खंडेराव महाराज मंदिर येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला. तर, पहाटे लंगर तोडून उत्सवाची सांगता झाली. खंडेराव मंदिरात भाविकांनी कुळाचाराप्रमाणे नेवेद्य घेऊन जात दर्शनासाठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT