kharif2.jpg 
नाशिक

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही स्थिती?...खरीप संपेलही तरी पीककर्ज, यूरियाच्या नावाने बोंब!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : खरीप हंगाम संपायला आला, पण खरीप कर्जाचा घोळ काही मिटलेला नाही. जिल्ह्यात ७० टक्के खरीप पेरण्या झाल्यानंतरही जेमतेम २९ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. पीककर्जापाठोपाठ आता यूरिया खताबाबत बोंबाबोंबच आहे. वेळेत पीककर्ज नाही; पण आता वेळेत खतही मिळेना. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या नाशिक जिल्ह्यातील ही स्थिती आहे.

पीक कर्जाकडे दुर्लक्षच

नाशिक जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ९३० कोटी रुपये साधारण २९ टक्के पीक कर्जवाटप झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी साधारण २०० कोटीचे पीककर्ज वाटप झाले. तर इतर सगळ्या बँका मिळून ९३० कोटीचे पीककर्ज वाटप झाले आहे. २३०० कोटींचे पीककर्जवाटप होणाऱ्या आणि राज्यात मोठा पत आराखडा असलेल्या नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या चर्चेत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पीक कर्जाकडे दुर्लक्षच झाले. निसर्ग चक्रीवादळासोबत पाऊस वेळेवर सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी जमेल तशी गरज भागवून घेत, खरीप पेरण्या संपत आल्या आहेत. पण पन्नास टक्के पीककर्ज वाटप झालेले नाही. 

हास्यास्पद सल्ला 

जिल्ह्यात यूरियाच्या टंचाईविरोधात शेतकरी तक्रारी करीत आहेत. यूरियाच्या गोण्यांसोबत दानेदार व तत्सम खतांच्या गोण्या बळजबरीने माथी मारल्या जात आहेत. बोगस बियाण्यांच्या तपासण्या करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश निघाले आहेत. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर वेळेत पीककर्ज नाही; पण वेळेत यूरिया मिळत नसल्याचे चित्र आहे. खरिपाच्या हंगामात मूळ खरिपाचा विषयच दुर्लक्षित आहे. त्यात आता शेतकऱ्यांनी कमी यूरिया घेण्याचे आवाहन सुरू झाले आहे. यूरियाचा काटकसरीने वाटप करण्याचा सल्ला हास्यास्पद असाच आहे. सध्या खरिपाची धामधूम आहे. ही धामधूम सुरू असताना खताची काटकसर करायची मग खरीप संपल्यानंतर यूरियाचं काय करायचं, शेतकरी खरिपात नव्हे, तर खरीप संपल्यावर खत घेणार आहे. एकूणच हे कृषीविषयक सल्लेही शेतकऱ्यांचा मनस्ताप वाढविणारेच आहे. 

कृषी विभागाने खरिपाच्या तोंडावर वेळेत पीककर्ज वाटपाचे नियोजन केले होते, पण ग्रामपंचायत निवडणुकांच्या आचारसंहितेमुळेच पीक कर्ज वाटपाला विलंब झाला. पुढील दोन आठवड्यात पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे. - दादा भुसे (कृषिमंत्री) 

खरिपासाठी सहाशे कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत दोनशे कोटींचे कर्जवाटप करण्यात आले असून, उर्वरित चारशे कोटींचे कर्जवाटप पुढील आठवड्यापर्यंत करण्याचा संकल्प आहे. - केदा आहेर, अध्यक्ष, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT