Kharif Season Sowing esakal
नाशिक

Kharif Season : खरीप पेरणीचे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर उद्दिष्ट; सोयाबीनच्या पेरणीची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

Kharif Season : कृषी विभागाने तालुक्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीनची होण्याची शक्यता आहे.

यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष असल्याने बाजरी क्षेत्रवाढीचे नियोजन करण्यात आले आहे. (Kharif sowing target on 65 thousand hectare area nashik news)

त्यासाठी ६४० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिक प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, गतवर्षी तालुक्यात ६३ हजार ६५८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात आली होती. गतवर्षी पेरणी केलेल्या क्षेत्रापेक्षा यंदा दीड हजार हेक्टर क्षेत्रावर जास्त पेरणी करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे.

गेल्यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने खरीप उत्पादनात लक्षणीय घट झाली. अतिवृष्टीने थैमान घातल्याने काढणीला आलेली पीके सडून गेली. पीक सोंगणीला आल्यानंतर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन उत्पादनात घट आली होती. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. सद्यस्थितीत पाऊस सुरु झाला असला तरी शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

पेरणीची घाई करु नये

पाऊस उशिरा येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे जमिनीत पूर्ण ओल आल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करून नये. शेतकऱ्यांनी सोयाबीन साठी घरगुती बियाणांचा वापर करावा. एक रुपयात पीक विमा असल्याने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दमदार पावसाची प्रतीक्षा

दोन दिवसांपासून तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून नांगरणी, वखरणी, खत पसरविणे आदी कामांबरोबरच बी-बियाणे, खते खरेदीसाठी आर्थिक जुळवाजुळव शेतकऱ्यांकडून सुरू आहे.

पेरणीसाठी जोपर्यंत योग्य पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये असे कृषी विभागाने सांगितल्याने शेतकरी राजा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. विठुरायाला साकडे घालून वारकऱ्यांनी पंढरपुराचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागलेले असताना आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वदूर हजेरी लावल्याने शेतकरी राजाचा आशा पल्लवीत झालेल्या आहेत.

"यंदा खरीपाचे निम्म्याहून अधिक क्षेत्र सोयाबीनचे असणार आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे सोयाबीनचे घरगुती बियाणे उपलब्ध असल्याने बियाणांची खरिपात टंचाई भासणार नाही." - ज्ञानेश्वर नाठे, तालुका कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Britain Politics: पंतप्रधानांवर राजीनाम्याचे सावट! १०० हून अधिक खासदारांचा दबाव; PM सोबत ब्रिटनमध्ये नेमकं काय घडतंय?

Pune Rain Update : उकाड्याने हैराण पुणेकरांना अखेर दिलासा! सिंहगड, कोथरूडमध्ये रिमझिम सरी, विश्रांतवाडीतही पावसाची हजेरी

BEST Strike: 'बेस्ट'कामगार थेट विधानभवनावर धडकणार; २५ हजार कामगार रस्त्यावर उतरणार, कृती समितीचा इशारा, मुंबईत हायअलर्ट!

Bihar Uranium Scare Explained: बिहारमधील आईच्या दुधात युरेनियम असल्याचा दावा अखेर खोटा ठरला? BARC च्या अहवालातून मोठा खुलासा

PF खातेदारांसाठी खुशखबर! कारण न देता मिळणार PFची संपूर्ण रक्कम? जाणून घ्या नवा नियम

SCROLL FOR NEXT