lokesh sawant 1.png
lokesh sawant 1.png 
नाशिक

कमाल! गुंगीच्या औषधाने विद्यार्थी होता बेशुद्ध...जाग आली तेव्हा..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लोकेशला मोसम नदीवर बांधलेल्या नवीन पुलाजवळ तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी रुमालात गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. आपल्या वाहनातून बिजोरसे रस्त्यालगत त्याला घेऊन गेले. ते मद्य पिण्यासाठी एका शेताजवळ थांबल्यानंतर लोकेशला शुद्ध आली..अन् मग... 

असा घडला प्रकार...

लोकेशला मोसम नदीवर बांधलेल्या नवीन पुलाजवळ तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी रुमालात गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. आपल्या वाहनातून बिजोरसे रस्त्यालगत त्याला घेऊन गेले. ते मद्य पिण्यासाठी एका शेताजवळ थांबल्यानंतर लोकेशला शुद्ध आली व त्याने वाहनातून पळ काढला. रात्री कडाक्‍याच्या थंडीत भेदरलेल्या अवस्थेत वाट मिळेल तिथे लोकेश सैरभैर पळू लागला. त्याचे कपडे चिखलाने माखलेले होते. काही वेळाने इंदिरानगरमधील आदिवासी तरुणांनी त्याची विचारपूस करून त्याला सुखरूप घरी सोडले. घरी आल्यानंतर लोकेशने वडील भाऊसाहेब सावंत यांना आपबीती सांगितली. वडिलांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी भाऊसाहेब सावंत यांच्या तक्रारीवरून जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.  

अपहरणाचा प्लॅन फिसकटला

नामपूर इंग्लिश स्कूल विद्यालयाचा सहावीचा विद्यार्थी लोकेश सावंत याचा तीन ते चार जणांनी गुंगीचे औषध देऊन अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र, लोकेशने शुद्धीवर आल्यानंतर वाहनातून पळ काढून सुटका करून घेतली. जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी गुरुवारी (ता. 16) घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Baramati lok sabha: मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT