Kidnapped Girl esakal
नाशिक

Crime Alert : चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण

प्रशांत बैरागी

नामपूर (जि.नाशिक) : येथील इंदिरानगर परिसरातील रहिवासी व नववीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला (Minor girl) नामपूर शहरातीलच एका तरुणाने फूस लावून चाकूचा धाक दाखवत पळवून (Kidnapping) नेल्याची घटना मंगळवारी (ता. १०) घडली. गेल्या चार दिवसांपासून संशयित तरुण जायखेडा पोलिसांना सापडत नसल्याने विधवा आईचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत मुलीची आई कल्पना सोनवणे (वय ३८) यांनी जायखेडा पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे. (Kidnapping of a minor girl at gunpoint Nashik Crime News)

इंदिरानगर येथील कल्पना सोनवणे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना दशु आणि अनुष्का अशा दोन मुली आहेत. मुलींनी शिकून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी नामपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये स्वच्छता कामगार म्हणून त्या काम करतात. १० मेस त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी आपली मुलगी दशुला कामासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविले. त्यानंतर तेथील काम आटोपल्यानंतर शिवमनगर येथील एका तरुणाने चाकूचा धाक दाखवून तिला पळवून नेल्याचे कल्पना सोनवणे यांनी सकाळला सांगितले. यानंतर आपल्या मुलीचा शोध लागावा, यासाठी त्यांनी तातडीने जायखेडा पोलिसांकडे धाव घेतली.

गेल्या चार दिवसांपासून आपल्या काळजाचा तुकडा दिसत नसल्याने आईचा जीव कासावीस झाला आहे. दशूची उंची ५ फूट २ इंच असून, तिचा रंग गोरा आहे. शरीराने मध्यम असलेल्या दशूने निळी जीन्स, काळा टीशर्ट घातला असून, उजव्या डोळ्याच्या खाली बारीक निशाणी आहे. पायात चप्पल घातल्याचे वर्णन फिर्यादीत करण्यात आले आहे. अशा वर्णनाची मुलगी कुठे दिसल्यास जायखेडा पोलिसांशी तातडीने संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी याकामी तातडीने तपासाची सूत्रे फिरवून गोरगरीब कुटुंबातील मातेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Accident: यूएईमध्ये भीषण अपघात; मृत्युमुखी पडलेल्या १३ जणांत भारतीयांचाही समावेश

आला रे आला! दोन वर्षांनंतर स्टार खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यास तयार; लिलावात नोंदवलं नाव, बेस प्राइज किती?

Shirur Crime News : शिरूरच्या मुंबई बाजारात भरदिवसा घरफोडी; दोन तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख दहा हजारांची रोकड चोरीला

Kaygaon News : ऊस दरावरून पंचायत समिती सदस्य बळीराम खताळ आक्रमक; चेअरमन कृष्णा पा. डोणगावकर यांनी पाठवली एक कोटींची मानहानी नोटीस

Bhau Flex Kadha Portal : फ्लेक्सविरोधात पुणेकर सरसावले! ‘भाऊ फ्लेक्स काढा’ पोर्टलवर पहिल्याच दिवशी १५० हून अधिक तक्रारी

SCROLL FOR NEXT