kisan-rail.jpg
kisan-rail.jpg 
नाशिक

शेतकऱ्यांनो बातमी तुमच्यासाठी! वरदायी 'किसान रेल'चे भाडे जाहीर, वेळही निश्चित 

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : शेतकऱ्यांसाठी वरदायी असलेल्या किसान रेलची भाडेनिश्‍चिती करण्यात आली आहे. ७ ऑगस्टपासून किसान रेल पार्सल गाडी सुरू करण्यात आली आहे. ही गाडी आठवड्यातून एक दिवस देवळाली ते दानापूर चालवली जाणार आहे.या किसान रेल चे भाडे आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. एकदा वाचाच ​

किसान रेल चे भाडे जाहीर, वेळही निश्चित    ​

प्रत्येक शुक्रवारी सकाळी अकराला देवळाली रेल्वेस्थानकावरून सुटेल व दुसऱ्या दिवशी शनिवार दानापूरला सायंकाळी १८.४५ वाजता पोचेल. तसेच दानापूर ते देवळाली ही गाडी प्रत्येक रविवारी दानापूरस्थानकाहून दुपारी १२ वाजता प्रस्थान करून सोमवारी ७.४५ वाजता देवळालीला पोचेल. किसान पार्सल रेल्वेला नाशिक रोड ११.१० आगमन, ११.३० प्रस्थान, मनमाड येथे १२.३५ आगमन, १२.५५ प्रस्थान, जळगाव येथे १४.५५ आगमन, १५.१५ प्रस्थान, भुसावळ- १५.४५ आगमन, १६.०५ प्रस्थान, बुऱ्हाणपूर- १७.०० आगमन, १७.२० प्रस्थान, खांडवा- १८.४० आगमन, १९.०० प्रस्थान करेल. इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्यायनगर आणि बक्सर याठिकाणी नियोजित थांबे देण्यात आले आहेत. 

प्रमुख स्थानकाचे शुल्क असे (प्रतिटन भाडे) 
१) नाशिक रोड/देवळाली ते दानापूर : रुपये ४,००१ प्रतिटन भाडे 
२) मनमाड ते दानापूर : रुपये ३,८४९ प्रतिटन भाडे 
३) जळगाव ते दानापूर : रुपये ३,५१३ प्रतिटन भाडे 
४) भुसावळ ते दानापूर : रुपये ३,४५९ प्रतिटन भाडे 
५) खांडवा ते दानापूर : रुपये ३,१४८ प्रतिटन भाडे  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT