Kasara Ghat
Kasara Ghat 
नाशिक

मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात दरड कोसळली

पोपट गवांदे

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रविवारी (ता. १८) रात्री मुंबई- नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. महाकाय दगडी व मातीचा मलबा रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली. तसेच, कसारा इगतपुरी रेल्वे मार्गांवर सोमवारी (ता.१९) सकाळी ६ वाजता किलोमीटर क्रमांक १२२/३८ वर महाकाय दरडी, झाडे व मातीचा मलबा कोसळला.

कसारा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी केशव नाईक व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन टिमच सदस्य श्‍याम धुमाळ, मनोज मोरे, अक्षय राठोड, विनोद आयरे, दत्ता वाताडे, महामार्ग सुरक्षा पोलिस घोटी केंद्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना थांबवून रस्यावरील एक लेन सुरू करण्यासाठी लहान दगडी बाजूला करून एक लेन संथगतीने सुरू केली. केशव नाईक व महामार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी अमोल वालझडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोल कंपनी यांच्याशी मदतीसाठी संपर्क केला. तब्बल दोन तासानंतर संबंधितानी जेसीबी घटनास्थळी पाठवला. दरम्यान, रात्री ११ ते १ या वेळात भर पावसात पोलिस व आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी नाशिककडे जाणारी वाहतूक विशेषतः लहान वाहनांची वाहतूक बॅटरीच्या साहाय्याने एक लेन संथगतीने सुरू ठेवली. रात्री दोनच्या दरम्यान संबंधित पिंक इन्फ्रा कंपनीचे रूट पेट्रोलिंग ऑफिसर रवी देहाडे, धीरज सोनावणे, सचिन भडांगे, जावेद खान, संदीप म्हसणे व टीम आल्यानंतर जेसीबीच्या मदतीने दरड हटवण्यात आली. यानंतर सर्व वाहतूक सुरळीत करण्यात आली. नाशिक मुंबई लेन वरील नवीन कसारा घाटातही काही झाडे व माती रस्त्यावर आली तीही बाजूला करण्यात आली.

दैव बलवत्तर.....

रविवार असल्याने कसारा मुंबई- नाशिक महामार्गांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. घाटात महाकाय दरड कोसळली त्या दरम्यान मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक लहान वाहने घाटाखाली थांबून होते. या महाकाय दरडीखाली एखादे वाहन सहज दडपले गेले असते. पण केवळ दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला.

रेल्वे वाहतूक धिम्या गतीने

या दुर्घटनेमुळे अप व डाउन मार्गाची रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. सर्व प्रकारच्या मेल व एक्स्प्रेस गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत होत्या. भर पावसात दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने डाउन मार्गाच्या गाड्या उशिराने धावत होत्या. या घटनेमुळे डाउन मार्गाच्या गाड्या मिडल मार्गावरून वळविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

SCROLL FOR NEXT