police recruitment
police recruitment esakal
नाशिक

Police Recruitment : पोलीस भरती ऑनलाईन अर्जासाठी शेवटचे 2 दिवस; इथे करा क्लिक

नरेश हाळणोर

नाशिक : बहुप्रतिक्षेत असलेल्या राज्यभरातील पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू असून, यासाठी अखेरचे दोन दिवस राहिले आहेत. यासाठी येत्या १५ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अखेरची मुदत आहे. राज्यभरात सुमारे १४ हजार जागांसाठी सुरू झालेल्या या पोलीस भरती प्रक्रियेत नाशिक ग्रामीणमध्ये १६४ जागांची भरती केली जाणार आहे. शासनाने मुदतवाढ दिल्याने उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास संधी मिळाली आहे. (Last 2 days for Police Recruitment Online Application Nashik News)

राज्यभरातील युवक पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर राज्य शासनाने राज्यात सुमारे १४ हजार जागांसाठी पोलीस भरतीची घोषणा केली आणि युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर सदरची प्रक्रिया पुन्हा रोखण्यात आली होती. यासाठी गेल्या ३० नोव्हेंबरपर्यंत अखेरची मुदत होती. परंतु, मुदतीपूर्वीच दोन-तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊनमुळे उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे राज्यभरातून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना दिलासा देत येत्या १५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली होती. यासाठी आता अखेरच्या दोन दिवसांची मुदत राहिली आहे.

गेल्या ९ नोव्हेंबरपासून भरतीय प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. या प्रक्रियेंअतर्गत नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये १६४ जागांसाठी भरती होणार आहे. यापूर्वी नाशिक ग्रामीणमध्ये ४५४ जागांसाठी भरती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, नव्याने जारी केलेल्या माहितीनुसार १६४ जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया होणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निर्धारित वेळेत अर्ज दाखल झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सदरची प्रकिया राबविताना पूर्णत: पारदर्शकता राखली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक उमाप यांनी दिली आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

१५ डिसेंबरपर्यत अखेरची मुदत

भरती प्रक्रियेची अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांना http://policerecruitment2022.mahait.org या वेबसाइटवर येत्या १५ डिसेंबरपर्यत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. कागदपत्रे, शैक्षणिक आर्हता, आरक्षण, परीक्षा शुल्क, प्रत्येक ठिकाणच्या रिक्ता जागांनुसारची भरतीची आहे. यासंदर्भात उमेदवारांना नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या ०२५३-२३०९७०० किंवा ०२५३-२२००४५० या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच, MahaIT हेल्पलाईन क्रमांक (सकाळी १०.३० ते सायं ०५. ०० या वेळेत) 022-61316418 यावरही संपर्क साधता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT