Leafy vegetables become expensive due to scorching summer  esakal
नाशिक

Vegetable Rate Hike : उन्हाच्या तडाख्याने पालेभाज्या महागल्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून तीव्र उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. त्यामुळे बुधवारच्या आठवडे बाजारातून पालेभाज्यांच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. (Leafy vegetables become expensive due to scorching summer nashik news)

इतर भाज्यांच्या दरातही वाढ झाल्याने आता गृहिणींचे भाजीपाल्याचे बजेट वाढण्याची चिन्हे आहेत. गत महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढली असून दुपारनंतर रस्त्यांवर शुकशुकाट होत आहे.

उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम भाजीपाल्यावरही होऊ लागला असून मेथी, कोथिंबीरसारख्या पालेभाज्यांच्या आवकेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे मेथीच्या जुडीसाठी तीस ते चाळीस रुपये मोजावे लागत होते. गावठी कोथिंबीर गायब झाली असून चायनीज कोथिंबिरीच्या छोट्या जुडीसाठी चाळीस ते पन्नास रुपये मोजावे लागत होते.

इतर भाज्यांत वांगी चाळीस ते पन्नास रुपये, बटाटे वीस, भेंडी चाळीस ते साठ, टोमॅटो चाळीस रुपये, हिरवी मिरची चाळीस रुपये किलो दराने उपलब्ध होते. याशिवाय कोबी, फ्लॉवरचा गड्डा पंधरा ते वीस रूपयांत उपलब्ध होता. याशिवाय कारली, गिलके चालीस रुपये किलो दराने उपलब्ध होती. एप्रिलच्या सुरवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढली आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

त्यामुळे दुपारी बारानंतर मेनरोड, कानडे मारुती लेन, शालिमार, रविवार पेठ या शहारातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. या उन्हाचा चटका आज आठवडे बाजारालाही बसला, दुपारी बारानंतर तीनपर्यंत अनेक विक्रेते ग्राहकाच्या प्रतीक्षेत होते.

कांदा बारा ते पंधरा रुपये किलो

बुधवारच्या आठवडे बाजारात लहान आकाराचा उन्हाळी कांदा दहा रुपये किलो तर मोठ्या आकाराचा कांदा पंधरा रुपये किलो दराने उपलब्ध होता. दहा किलो कांदे एकदम खरेदी केल्यास त्यासाठी बारा ते पंधरा रुपये दर होता. मसाले व वेफर्स करण्यासाठी महिलांची कांदा व बटाटे खरेदीस मोठी पसंती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT