forest department leopard resue operation
forest department leopard resue operation esakal
नाशिक

Nashik : विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान

योगेश सोनवणे

पिंपळगाव (वा.) (जि. नाशिक) : भिलवाड (ता. देवळा) परिसरात नैसर्गिक अधिवास चुकलेला व रात्री रस्त्याचा अंदाज न आल्याने विहिरीत पडलेल्या बिबट्यास (Leopard) वन विभाग (Forest Department) व ग्रामस्थांच्या मदतीने जीवदान (Resued) दिले. सुमारे दीड ते दोन वर्षाचा बिबट्या होता. मोठ्या प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने जीवदान देण्याची ही तालुक्यातील दुसरी घटना आहे. (leopard lying in well saved by forest department at malegaon Nashik News)

पशुवैद्यकीय विभागाने बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. बिबट्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली. भिलवाड येथे मंगळवारी (ता. २८) बाळासाहेब पोपट जाधव यांची गट क्रमांक ५० मध्ये विहीर आहे. या विहिरीत सोमवार (ता. २७) बिबट्या पडल्याची माहिती वन विभागास भ्रमणध्वनीद्वारे समजली. वन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत लाकडाचा एक ओंडका दोराच्या साहाय्याने बिबटच्या आधारासाठी विहिरीत सोडला. या वेळी परिसरात जोरदार सुरू असलेला पाऊस रेस्क्यू ऑपरेशनच्या कामकाजात व्यत्यय आणत होता. या परिसरातील वाढता अंधार व विहीर अरुंद असल्याने वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन स्थगीत करून मंगळवारी (ता. २८) सकाळी सातला पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.

उपस्थित वन विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडून बिबट्यास सुखरूप पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले. बिबट्यासह पिंजरा देवळा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात आणला. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. पूजा घाडगे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यानुसार बिबट्याची मादी असल्याचे निदर्शनास आले. त्याचे वय दीड ते दोन वर्ष असल्याचे सांगण्यात आले. बिबट्याची मादी तंदुरुस्त व सुदृढ असल्याने त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी के. पी. ढुमसे यांनी दिली. हे रेस्क्यू ऑपरेशन नाशिक पूर्व विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वावरे व सहाय्यक वनसंरक्षक संजय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यात भिलवाड गावचे ग्रामस्थ, वन विभागाचे कर्मचारी देवळा, रेस्क्यू टीम येवला यांनी मोलाचे सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT