leopard that terrorized the city area in Igatpuri was finally captured Sakal
नाशिक

नाशिक : इगतपुरीत दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

पोपट गवांदे

इगतपुरी शहर : इगतपुरी शहर परिसरात नागरिकांमध्ये दहशत माजवणारा बिबट्या अखेर गुरुवार (ता. ११ रोजी) पहाटे पिंजऱ्यात अडकला. सह्याद्रीनगर भागात २ दिवसांपूर्वी एक व्यक्तीवर हल्ला करून जखमी करणारा हा बिबट्या आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या परिसरात अजूनही एक बिबट्या असल्याची शक्यता गृहीत धरून वन विभागाने पिंजरा लावला आहे.

इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव आदींनी जेरबंद केलेल्या बिबट्याबाबत पुढील सोपस्कार केले. नागरिक भयमुक्त होण्यासाठी वन विभाग कटिबद्ध असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी सांगितले.आज पहाटे इगतपुरी येथील शिवाजी नगर परिसरात पिंजऱ्यात हालचाल जाणवल्याने एका व्यक्तीने वन विभागाच्या कळवले. त्यानुसार ह्या पिंजऱ्यात दहशतखोर बिबट्या अडकल्याचे स्पष्ट झाले.

हा बिबट्या १ वर्षाचा असून त्यासोबत अजून एक बिबट्या असू शकतो. हे गृहीत धरून अजून एक पिंजरा लावण्यात आलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी नगर व परिसरात ह्या बिबट्याने धुमाकूळ घातला होता.त्याने एका इसमावरही हल्ला केला होता. अखेर वनविभागाच्या प्रयत्नाला यश आले. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली. वन विभागाने बिबट्याला ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी हलवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: महाराष्ट्र पोलिसांत ‘म्युझिकल चेअर’ पोस्टिंग! ६ दिवसांत १४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Pat Cummins: एलिमिनेटरच्या तयारीला सुरुवात! विजयानंतर पॅट कमिन्सचा 'मास्टर प्लॅन'

तो सतत टोमणे मारत होता... सेटवर दिग्दर्शकाने अमृता खानविलकरला मारलेला धक्का, म्हणाली, 'शेवटी त्याच्या कर्माचं फळं त्याला मिळालंच '

Joe Root On Sachin Tendulkar Record:'... आता दुर्लक्ष करू शकत नाही', सचिनचा कसोटीतील विक्रम मोडण्याबाबत रुट नेमकं काय म्हणाला?

मुंबई मेट्रो-११ चा बांद्रा टर्मिनसपर्यंत विस्तार होणार! गरीब नगर कारवाईनंतर मार्ग मोकळा; अंडरग्राउंड मेट्रो धावणार

SCROLL FOR NEXT