1 (6).jpg 
नाशिक

भरदिवसा बिबट्या मोठ्या ऐटीत शेतात फिरतांना दिसतो तेव्हा...परिसरात खळबळ

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (भगूर) राहुरी शिवारातील मळ्यात शेतकरी कामात दंग असतांना घडली धक्कादायक घडना...रविवारी (ता. २) अचानक भरदिवसा एक बिबट्या एका शेतातून दुसऱ्या शेतात जेव्हा मोठ्या ऐटीत फिरतांना दिसतो तेव्हा...थरारक घटनेने परिसरात खळबळ

असा आहे प्रकार

राहुरी शिवारातील ऊसाच्या मळ्यात रविवारी (ता. २) भरदिवसा बिबट्याने एका शेतातून दुसऱ्या शेतात धावाधाव करत दर्शन दिल्याने शेतकऱ्यांची भंबेरी उडाली. या घटनेने भगूर भागात पुन्हा बिबट्याचा संचार वाढल्याचे यामुळे स्पष्ट झाले. संबंधित घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने धाव घेत पाहणी करून पिंजरा लावण्याची तजवीज केली. दारणा नदीकाठालगतच्या गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम असून, या भागातील नाशिक परिक्षेत्रांतर्गतच्या गावांमध्ये अद्याप सात बिबटे जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. संतोष रामदास सानप यांच्या शेतात बिबट्या मुक्तसंचार करत होता. 

वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, वनरक्षक विजय पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करून शेतकऱ्यांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. तसेच तत्काळ या भागात शास्त्रीयदृष्ट्या योग्य पद्धतीने पिंजरा तैनात करण्यात आला आहे. भरदिवसा बिबट्याने मुक्तपणे संचार केल्याने तो अनेकांच्या नजरेस पडल्याने परिसरात घबराट पसरली. नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षितेच्यादृष्टीने वनविभागाने सांगितलेल्या सूचना व उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी केले आहे.

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT