A leopard confined in a cage kept in Bhagwant Navale's farm here. esakal
नाशिक

Nashik News : पाथर्डी भागात बिबट्या जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : गेल्या अनेक दिवसांपासून पाथर्डीकरांची झोप उडवणाऱ्या बिबट्या रविवारी (ता.२०) पहाटे भगवंत नवले यांच्या शेतात ठेवलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. (Leopards jailed in Pathardi area Nashik Latest Marathi News)

पाथर्डी भागात सातत्याने बिबट्याचा वावर होत असल्याची माहिती स्थानिक शेतकरी भाऊसाहेब नवले यांनी दिली होती. अनेकांना या बिबट्याचे दर्शन देखील झाले होते. त्यामुळे वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर आठ दिवसांपूर्वी सर्वे क्रमांक २१६ मधील भगवंत नवले यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्यामध्ये पिंजरा लावण्यात आला. बिबट्याला दररोज या ठिकाणी बघितले जायचे मात्र बिबट्या हाती लागत नव्हता. आज सकाळी साडेसहाला नेहमीप्रमाणे जयेश नवले पाण्याचा पंप सुरू करण्यासाठी केला. त्याला पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे दिसले.

त्याने भाऊसाहेब नवले, पोपट नवले, धीरज नवले, दशरथ नवले, गणेश नवले आदींना बोलावले. वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनपाल अनिल अहिरराव, गोविंद पंढरे यांच्यासह सहकारी येथे आले. त्यांनी पिंजरा वनविभागाच्या वाहनाला जोडून गंगापूर रोपवाटिकेमध्ये या बिबट्याला स्थलांतरित केले. दरम्यान आज मिळून आलेला बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वय सुमारे दोन वर्षे असल्याचे श्री. अहिरराव यांनी सांगितले. परंतु, या भागात अजून एक बिबट्या असल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT