The students of Zilla Parishad School here who are interested in learning agriculture. In the second photo, students cutting the carols in the backyard
The students of Zilla Parishad School here who are interested in learning agriculture. In the second photo, students cutting the carols in the backyard esakal
नाशिक

Nashik News: शालेय शिक्षणाबरोबरच आधुनिक शेतीचे धडे! हिवाळीच्या विद्यार्थ्यांनी फुलविली परसबाग

केशव मते

नाशिक : प्रधानमंत्री पोषण योजनेंतर्गत शालेय परसबाग योजनेत सहभागी होत जिल्हा परिषदेच्या हिवाळी येथील विद्यार्थ्यांनी बाग फुलविली आहे.

डोंगराळ भागात राहून सेंद्रिय शेतीचा अनोखा प्रयोग शिक्षक केशव गावित यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांनी केला.

हिवाळी शाळेतील ५५ विद्यार्थी शालेय शिक्षणाबरोबरच आधुनिक शेतीही शिकत आहेत. (Lessons in modern agriculture along with school education garden flowered by hiwali zp school students at trimbakeshwar Nashik News)

राज्याच्या सीमेवर डोंगराळ भागात असलेल्या हिवाळी गावात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ही परसबाग फुलविली आहे. सेंद्रिय शेतीसाठी गावकऱ्यांनीही मदतीचा हात पुढे केला. हरिदास भुसारे यांनी स्वमालकीची जमीन विद्यार्थ्यांना परसबागेसाठी दिली आहे.

गावाच्या विहिरीतून परसबागेसाठी पाणी दिले जाते. गिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून दत्तू ढगे यांनी शाळेला देशी बियाणे रोपे उपलब्ध करून दिली.

आठवड्यातून एक दिवस शालेय परसबागेचा अभ्यास मुले करतात. शेतीतील पिकाला गरजेनुसार दिनक्रम ठरवून पाणीही दिले जाते. ड्रीप व मल्चिंग पेपरचा वापर करून आधुनिक शेतीचा प्रयोग विद्यार्थी करीत आहेत.

शेतात वांगे, टॉमेटो, वाल, भोपळा, कारले, डांगर, गिलके, कोबी, फ्लॉवर, माठ, मेथी, रताळे, पपई, आंबा, केळी यांची लागवड करण्यात आली. यासाठी फवारणी, खुरपणी, पाणी देणे, पिके काढणे अशी कामे विद्यार्थीच करतात.

या बागेसाठी शेणखत व गांडुळखताचा वापर केला जातो. या परसबागेतील पिके मुले दोन वेळच्या जेवणासाठी वापरतात. अतिरिक्त भाजीपाला बाजारात विक्रीसाठी पाठविला जातो.

यातून खर्च भागविणे शक्य होत आहे. शिवाचार्य ट्रस्टच्या माध्यमातून शाळेला गाय मिळाली. या माध्यमातून गोपालन केले जाते. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना यामुळे दररोज दूध दिले जात आहे.

प्रधानमंत्री पोषण योजनेंतर्गत शाळांमध्ये स्पर्धाही राबविल्या जातात. त्र्यंबकेश्वर तालुकास्तरीय स्पर्धेत हिवाळी जिल्हा परिषद शाळेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. राज्यस्तरावरही शाळेला नेण्यासाठी शिक्षक व ग्रामस्थ प्रयत्न करतात. हिवाळीच्या या परसबागेचे ग्रामस्थांसह परिसरात कौतुक होत आहे.

"अभ्यासक्रमाबरोबरच शेतीचेही शिक्षण मिळावे, विद्यार्थ्यांच्या कलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अभ्यासक्रमाबरोबर सेंद्रिय शेतीचेही शिक्षण महत्त्वाचे आहे. प्रधानमंत्री पोषण योजनेंतर्गत शालेय परसबाग योजनेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व व शिक्षण दिल्याचे समाधान आहे."- केशव गावित, शिक्षक, हिवाळी जिल्हा परिषद शाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT