NMC Latest Nashik news esakal
नाशिक

अधिकाऱ्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर; अतिरिक्त आयुक्तांच्या लेटर बॉम्बने खळबळ!

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेत प्रशासकीय व राजकीय पातळीवर लेटर बॉम्ब फोडणे हे आता नवीन नसले तरी अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांच्या एका लेटरमुळे अधिकाऱ्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. विभागप्रमुखांना एका चालीत आणण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी नेमकी नस पकडताना ठेकेदारांमार्फत फाइलचे ट्रेकिंग होत असल्याचा थेट आरोप करून खळबळ उडून दिली आहे. (letter bomb of NMC Additional Commissioner Ashok Atram confusion among officials Nashik Latest News)

महापालिकेत नव्याने रुजू झालेल्या अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांच्याकडे यापूर्वी वैद्यकीय व आरोग्य सेवेचा कार्यभार होता. मात्र, अतिरिक्त आयुक्त असल्याने अधिक विभागांचा कार्यभार मिळावा, अशी त्यांची अपेक्षा होती. सुरेश खाडे यांच्याकडे तब्बल चाळीसहून अधिक विभागांचा कार्यभार असल्याने विभागांचे समान वाटप व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

सध्या सुरेश खाडे यांची बदली मंत्रालयात झाल्याने व ते महिनाअखेर सेवानिवृत्त होत असल्याने अतिरिक्त आयुक्त क्रमांक एक हे पद महापालिकेत रिक्त आहे. त्यामुळे आयुक्तांनंतर साहजिकच अतिरिक्त आयुक्तांकडे अधिकार येतात. परंतु, विद्यमान अतिरिक्त आयुक्त अत्राम यांना डावलून विभागप्रमुख थेट आयुक्तांकडे नस्ती मंजुरीसाठी दाखल करतात.

ही बाब अतिरिक्त आयुक्तांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी अधिकारांचे शस्त्र बाहेर काढत आरोग्य व घनकचरा विभाग, अग्निशमन, नगर सचिव, विधी विभाग, अतिक्रमण विभाग, राष्ट्रीय फेरीवाला धोरण विभाग, कामगार कल्याण विभाग, क्रीडा तसेच अन्य खाते प्रमुखांना पत्र पाठवत अतिरिक्त आयुक्तांच्या मार्फत आयुक्तांकडे नस्ती पाठविण्याच्या सूचना केल्या आहे. याचाच अर्थ अतिरिक्त आयुक्तांना विचारात घ्यावे, असा होत असल्याने या मुद्द्यावरून महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांमध्ये धुसफूस असल्याचे स्पष्ट होत आहे.

उणिवा बाहेर

अतिरिक्त आयुक्त अत्राम यांनी विभागप्रमुखांना सूचना देताना दुसरीकडे त्यांच्या कामकाजातील उणिवादेखील बाहेर आणल्या आहे. फाइल दाखल झाल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही त्या संदर्भात माहिती नसणे गरजेचे आहे. परंतु, अधिकाऱ्यांच्या अगोदरच ठेकेदारांच्या व्हॉट्स ॲपवर फाइलचे ट्रेकिंग व त्यावर लिहिलेली टिपणी बाहेर येत असल्याचे निदर्शनास आणताना कारवाईचा इशारा देत विभागप्रमुखांना अधिकाऱ्यांची जाणीव करून दिली आहे.

"आयुक्त व विभागप्रमुखांमध्ये अतिरिक्त आयुक्त आहे. मात्र, थेट आयुक्तांकडे फाइल मंजुरीसाठी जाते ही बाब अयोग्य आहे. अतिरिक्त आयुक्त म्हणून कामांच्या फाइल माहिती असणे गरजेचे आहे. त्या व्यतिरिक्त फाइलचे ट्रेकिंग ठेकेदारांच्या व्हॉट्स ॲपवर उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी आल्याने त्या अनुषंगाने विभागप्रमुखांना पत्र दिले आहे."

- अशोक अत्राम, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT