burn documents 123.jpg 
नाशिक

..म्हणून कृषिमंत्र्यांच्या पत्राची चुलीत होळी करतोय; शेतकरी दांपत्याकडून संताप व्यक्त

माणिक देसाई

निफाड (जि.नाशिक) : शेतकरी संजय साठे यांना मोबाईलवर केंद्रीय कृषिमंत्री यांचा मेसेज आला. त्यात म्हटले होते, की,केंद्राने केलेले कृषी कायदे कसे फायद्याचे आहे हे तुम्हाला पत्राद्वारे समजून सांगत आहे. ते पत्र संजय साठे यांनी डाउनलोड केले. त्यावेळी त्यांचा संताप झाला..कारण....

पत्राला घरातल्या चुलीत जाळून होळी
नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांना सोमवारी (ता. २१) मोबाईलवर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचा मेसेज आला. त्यात म्हटले होते, की,केंद्राने केलेले कृषी कायदे कसे फायद्याचे आहे हे तुम्हाला पत्राद्वारे समजून सांगत आहे. सदरचे पत्र संजय साठे यांनी डाउनलोड केले. ते पत्र त्यांनी वाचले असता, त्यात कृषिमंत्री तोमर यांनी म्हटले आहे, की मी हाडाचा शेतकरी आहे. ते जर हाडाचे शेतकरी असते तर दिल्लीत कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर कडाक्याच्या थंडीत गार पाण्याचे फवारे मारले नसते. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या नसत्या.

संतप्त भावना

२६ दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, तसेच कांद्याची बंद निर्यात खुली व्हावी या उद्देशाने नैताळे (ता. निफाड) येथील शेतकरी संजय साठे यांनी त्यांना आलेल्या केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या पत्राला घरातल्या चुलीत जाळून होळी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

ते जर हाडाचे शेतकरी असते तर....

आज आंदोलनाचा २६ वा दिवस आहे. ३४ शेतकरी शहीद झाले आहेत, हे झाले नसते. तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी नाहीत, तुमचे धोरण शेतकऱ्यांना नुकसानीत भर टाकणारे आहे. तसेच कांदा आयातीसाठी ३१ जानेवारीपर्यंत सवलत दिल्याने आता कांदा किमान ३१ जानेवारीपर्यंत निर्यात होणार नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे तुम्ही घेतलेल्या धोरणांना विरोध करत कांदा निर्यातबंदी खुली व्हावी, तसेच दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या हेतूने तुम्ही पाठवलेल्या पत्राची आमच्या कौटुंबिक पारंपरिक चुलीमध्ये होळी करून तुमच्या धोरणांचा निषेध करत असल्याची संतप्त भावना व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

बालीत सुट्टी एन्जॉय करणं पडलं महागात! नुसरत भरुचाच्या भीषण अपघात, मुंबईत होणार सर्जरी

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Ratnagiri News : देवरूखच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Weather: ऑक्टोबर हीट'चा मुंबईला चटका, तापमानाचा पारा चाळिशीजवळ; पाहा IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT