pentioner.jpg 
नाशिक

"मोदीजी याचे उत्तर द्या..अन्यथा करू सामुदायिक आत्महत्या"; पेन्शनर्स संघटनेचे थेट पंतप्रधानांना पत्र 

युनूस शेख

नाशिक : ईपीएफ-९५ पेन्शनर्स मागणीस घेऊन केंद्र सरकारने दिलेले आश्‍वासन त्वरित पूर्ण करावे. त्यांचा हक्क त्यांना द्यावा. त्यांनी केलेल्या विविध मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी पेन्शनर्सनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. पत्राचे उत्तर पत्रानेच कळवावे, अन्यथा सामुदायिक आत्महत्या शेवटचा पर्याय असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

उत्तर न दिल्यास सामुदायिक आत्महत्येचा इशारा 

देशात सुमारे ६५ लाख ईपीएफ-९५ पेन्शनर्स आहेत. गेल्या दहा वर्षांपासून पेन्शनवाढ, महागाई भत्ता सुरू करणे, आरोग्य वैद्यकीय सेवा, मेडिक्लेम, अन्नसुरक्षेचा लाभ यासह इतर प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्यांना केवळ आश्‍वासनांवर समाधान मानावे लागते. महागाईच्या काळात एक हजार ५०० रुपयांच्या तुटपुंज्या पेन्शनवर घरखर्च भागविणे अडचणीचे आहे. नोकरीवर असताना वेतनातून कपात झालेले सुमारे चार हजार लाख कोटी केंद्र सरकारकडे जमा आहेत. तीच रक्कम व्याजासह पेन्शन रूपात परत करावी. सुमारे सहा वर्षांपूर्वी बीड येथे झालेल्या मेळाव्यात प्रकाश जावडेकर यांनी तीन हजार पेन्शनवाढ आणि महागाई भत्ता देण्याचे आश्‍वासन दिले.

पेन्शनर्स संघटनेचे थेट पंतप्रधानांना पत्र 

शिर्डी येथे २०१७ मध्ये झालेल्या सभेत बंगारू दत्ता यांनी सात हजार ५०० पेन्शन तसेच महागाई भत्तावाढ देण्याचे जाहीर केले होते. केंद्र सरकारने नेमलेल्या भगतसिंह कोश्यारी समिती अहवालातही तीन हजार पेन्शनवाढ आणि महागाई भत्ता देण्याचे नमूद आहे. तरीदेखील अद्याप कुठला लाभ मिळाला नाही. केवळ आश्‍वासनांची खैरात झाली. केंद्र सरकारने दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे. या मागणीसाठी बॉश निवृत्त कल्याण मंडळातर्फे नरेंद्र मोदी यांना टपाल विभागाच्या माध्यमातून पत्र पाठविण्यात आले.  

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Pune Accident: पुण्यातील मुथाळणे घाटात शेतमजूरांची पिकअप पलटली; एक गंभीर तर १८ किरकोळ जखमी!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune News: पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; भूसंपादनासाठी पालिकेकडून १३६ कोटींचा निधी, एप्रिलअखेर प्रक्रिया पूर्ण होणार!

भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजनांवर गंडांतर; चार हजार योजनांकडे १४८ कोटींची थकबाकी; आता कनेक्शन कापणार?

SCROLL FOR NEXT