Licenses of 32 agricultural service centers suspended in Nashik
Licenses of 32 agricultural service centers suspended in Nashik sakal
नाशिक

वर्षभरात ३२ कृषी सेवा केंद्रांचे नाशिक जिल्ह्यात परवाने निलंबित

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रक पथकाने वर्षभरात केलेल्या कारवाईमध्ये जिल्ह्यातील ३२ कृषी सेवा केंद्र विक्रेते यांच्या दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या १७ कृषी निविष्ठा विक्रेत्यांविरोधात न्यायालयीन खटलेदेखील दाखल केले आहेत.

शेतकऱ्यांना रासायनिक खते सहजरीत्या उपलब्ध व्हावे म्हणून कृषी विभागातर्फे कृषीनिविष्ठा विक्री केंद्र परवाना दिला जात असतो. त्यात विक्रेते खते, औषधे, बी-बियाणे विक्री असे सेवा देत असतात. यामध्ये परवानाधारक विक्रेते यांना शासनाने ठरवून दिलेल्या औषधे व खतांची विक्री करणे ह्या विक्रेत्यांना बंधनकारक असते. मात्र अनेकदा विक्रेते कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाने मागील वर्षभरात ६९०० केंद्रांवर खते व औषधांची तपासणी केली. या तपासणीमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळल्याने त्यांनी २४१० नमुने तपासणीसाठी घेतले. नमुने चुकीचे आढळल्यामुळे ३२ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे खरेदीनंतर कच्च्या पावत्या दिल्या जात नाहीत. यामुळे बियाणे सदोष असणे, किटक नाशकांचे दुष्परिणाम आदी घटना उघडकीस येतात. यामुळे कृषी विभागाकडून विक्रेते नियमांचे पालन करतात की नाही हे बघून त्यांनी विकलेल्या मालाची तपासणी कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाची भरारी पथके करतात. यासाठी जिल्हा परिषद व राज्य सरकारच्या कृषी विभागातील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांचे पथक कार्यरत असते.

मागील वर्षभरात या भरारी पथकाकडून सहा हजार ९०० निविष्ठा विक्री केंद्रांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. या केंद्रांमधून दोन हजार ४१० नमुने हस्तगत करत त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली असता यामध्ये १०९ नमुने अप्रमाणित आढळून आले. यामुळे कृषी विभागाकडून ३२ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! दिल्लीतील दोन सरकारी हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याचा ई-मेल; सर्च ऑपरेशन सुरू

गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात

Dr. Shrikant Shinde : भविष्यात देखील आम्ही एकत्र असू ; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पुढील युतीचे संकेत

Satara News : वृक्षांची कत्तल झाली, पर्यायी वृक्षलागवड कधी? सातारा जिल्ह्यात महामार्ग बोडकेच

Char Dham Yatra : चार धाम यात्रेला जाताय? तिथल्या या गोष्टींबद्द्ल तुम्हाला ही माहिती असायलाच हवी!

SCROLL FOR NEXT