नाशिक : सिडकोत राहणाऱ्या आरोपीने दुसरी बायको करायची म्हणत पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.
गंभीररित्या भाजलेल्या पत्नीच्या फिर्यादीवरून प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. (Life imprisonment for husband who set his wife on fire testimony of plaintiff wife important Nashik Crime)
प्रकाश काशिनाथ पाटोळे असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना फेब्रुवारी २०१३ मध्ये घडली होती. आरोपी प्रकाश व त्याची पत्नी कविता हे दाम्पत्य दोन मुली व एक मुलगा यांच्यासह सिडकोतील साईबाबा नगरमध्ये राहत होते.
त्यांच्यात नेहमी भांडण होत असे. तसेच, आरोपी प्रकाश त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावरही संशय घेत भांडण असे. त्यावरून त्याच्याविरोधात कौटुंबिक छळवणुकी अन्वये भादंवि ४९८ नुसार गुन्हा दाखल होता.
परंतु तो खावटी देण्यास असमर्थ असल्याने पत्नी पुन्हा त्याच्याकडे नांदावयास आली होती. येऊन सहा महिने झालेले असतानाच त्यांच्याच पुन्हा वाद होऊ लागले.
१९ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या पुन्हा वाद होऊन आरोपी प्रकाश याने ‘मी दुसरी बायको करतो’ असे म्हणत पत्नी कविताच्या अंगावर रॉकेल ओतले आणि पेटवून देत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
यात पत्नी कविता गंभीररित्या जखमी झाली होती. अंबड पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक एम. एम. गावित यांनी गुन्ह्याचा तपास करीत सबळ पुरावे गोळा केले. त्यानुसार न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदरचा खटला जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायधीश मृदुला भाटिया यांच्यासमोर खटला चालला. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्रीमती रेश्मा जाधव यांनी कामकाज पाहत चार साक्षीदार तपासले.
यात फिर्यादी कविता व वैदयकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यानुसार, न्यायालयाने आरोपी प्रकाश याला जन्मठेप आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक अण्णा कुवर, हवालदार पार्वती चौधरी यांनी पाठपुरावा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.