wine rang_0.jpg 
नाशिक

तळीरामांसाठी गुड न्यूज...अटी-शर्तींवर मद्याच्या दुकानांसाठी परवाने मिळणार!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : रांगेत उभे राहिल्यावर सोशल डिस्टन्सिंगसाठी सांगूनही तळीराम तयार नाहीत म्हटल्यावर पोलिसांकडून छडीचा प्रसाद, तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत वाइन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने तळीरामांचा आनंद औटघटकेचा ठरला. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी (ता. 5) स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रत्येक दुकानदाराकडून लेखी घेऊन परवाने मिळतील, असे स्पष्ट केल्याने तळीरामांना पुन्हा "गुड न्यूज' मिळाली आहे. 

मद्याच्या दुकानांसाठी परवाने मिळणार 

वाइन दुकानात गोंधळ झाला. त्याचा अनुभव राज्यात आला. त्यामुळे दुकाने बंद करावी लागली, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की शारीरिक अंतर पाळावे लागेल, मास्कचा वापर करावा लागेल, शांतता ठेवावी लागेल यासंबंधीचे लेखी दुकानदारांना द्यावे लागेल. बेशिस्तपणा केल्याने दुकान सुरू होणार नाही, हेही ध्यानात ठेवावे. मुळातच, आज ना उद्या अर्थात कधी ना कधी दुकाने सुरू होणार आहेत. त्यासाठी अटी- शर्ती लागू राहतील. मद्याची दुकाने सुरू करण्यासंबंधीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, त्यासंबंधीचे धोरण निश्‍चिती यासाठी वेळ लागल्याने वाइन दुकाने सुरू करण्याचे आदेश दुपारी निघाले. मात्र ग्राहकांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. त्यामुळे गोंधळ उडाला. आता यापुढे असे होऊ नये, याची काळजी घ्यावी लागणार आहे. 

रेड झोनमुळे नाही परवानगी 

भुजबळ नॉलेज सिटीतर्फे पंजाबमधून आलेल्या विद्यार्थ्यांना राज्यातील विविध भागामध्ये पोचविण्यासाठी बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसगाड्यांमधून राज्याच्या विविध भागातून विद्यार्थी नाशिकला परत येऊ शकतात. त्यासंबंधीची काही उपाययोजना केली आहे काय? या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. भुजबळ यांनी, नाशिक रेड झोनमध्ये असल्याने बसगाड्यांमधून नाशिकला कुणाला येता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले. आपत्ती व्यवस्थापनाचे नियम पाळावे लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे. 

मालेगावकरांनी घ्यावेत उपचार 

मालेगावमधील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतो आहे. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. भुजबळ म्हणाले, की मालेगावकरांनी सहकार्य करायला हवे. मालेगावकर घरी राहतात; पण रुग्णालयात येत नाहीत. रुग्णालयात येऊन बरे होणार नाही, असा समज अनेकांमध्ये आहे. पण घरच्या घरी बरे होऊ, अशी भावना असलेले मालेगावकर घरी उपचार घेतात की नाही, हे माहिती नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरच्या कुलगाममध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; मजुरांवर दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या तरुणाचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Dhom Dam: वाईत धोक्याची घंटा! धोम धरणाचा विसर्ग वाढला; महागणपती मंदिरात घुसले पुराचे पाणी

SCROLL FOR NEXT