Dr. Ashok Karanjkar esakal
नाशिक

NMC News: दीड महिन्यात मंजूर फायलींची यादी करा तयार; आयुक्त करंजकर यांच्या प्रशासनाला सूचना

सकाळ वृत्तसेवा

NMC News : दीड महिन्यानंतर महापालिकेला पूर्ण वेळ आयुक्त मिळाल्यानंतर नवीन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दीड महिन्यात मंजूर झालेल्या फाइल तसेच बदल्या संदर्भातील निर्णयांच्या आदेशांची यादी तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याने पहिल्या दिवसापासून आयुक्त ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. (List of approved files ready in 1.5 months Notice to NMC Commissioner Karanjkar administration nashik)

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर आयुक्तपदाचा कार्यभार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे देण्यात आला. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार मसुरी होऊन परतत असताना त्यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली.

त्यामुळे गमे यांच्याकडेच आयुक्तपदाचा कार्यभार कायम राहिला. गमे हेदेखील दीर्घकाळ रजेवर गेल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार आला. त्यानंतर राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्याकडे नवीन आयुक्त नियुक्तीपर्यंत पदभार दिला.

गेल्या दीड महिन्यापासून महापालिकेला पूर्ण वेळ आयुक्त मिळाला नाही. पालकमंत्र्यांमध्ये आयुक्त देण्यासंदर्भात एकमत होत नसल्याने विलंब झाला. अखेरीस शुक्रवारी रात्री राज्यात ४६ बदल्या करताना नाशिक महापालिकेत डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पहिल्या दिवसापासून ‘ॲक्शन मोड’

शनिवारी सायंकाळी आयुक्त करंजकर यांनी पदभार स्वीकारला. त्याचवेळी आयुक्तांनी महापालिकेच्या कामकाजासंदर्भात चौकशी करण्याचे सूचित केले. मागील दहा ते पंधरा दिवसांमध्ये महापालिकेत जवळपास दोनशे ते सव्वादोनशे फाइल मंजूर झाल्या.

चुकीच्या पद्धतीने फाइल मंजूर झाल्याची चर्चा आहे, त्या अनुषंगाने मागील दीड महिन्यात मंजूर झालेल्या फायलींची यादी करण्याच्या सूचना डॉ. करंजकर यांनी प्रशासनाला दिल्या. चुकीच्या पद्धतीने अधिकारांकडे कार्यभार दिल्याने त्या संदर्भात देखील यादी करण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Match Fixing : भारतीय क्रिकेटवर पुन्हा मॅच फिक्सिंगचे सावट; चार खेळाडू निलंबित, नेमकं काय घडतंय?

Mickey Mouse: ‘मिकी माउस’ आता ‘सोरा एआय’वर; ‘ओपन एआय’मध्ये ‘डिस्ने’कडून एक अब्ज डॉलरची गुंतवणूक

MPSC and NET Exam : ‘एमपीएससी’, ‘नेट’ एकाच दिवशी; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी अन्‌ परीक्षेबाबत संभ्रम

Mango Seed Oil : आता 'हापूस'च्या कोयींपासून तयार होणार तेल अन् मँगो बटर; राजापुरात संशोधनाची कमाल, 'अशी' केली तेलनिर्मिती

Sahyadri Express : कोल्हापूर–मुंबई प्रवासासाठी हक्काची गाडी हरवली; सह्याद्री एक्स्प्रेसच्या विस्तारावर रेल्वेची उदासीन भूमिका

SCROLL FOR NEXT