NMC Nashik news esakal
नाशिक

NMCकडून कृत्रिम व नैसर्गिक स्थळांची यादी जाहीर

विक्रांत मते

नाशिक : गणेशमूर्ती विसर्जन करताना पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी महापालिकेकडून नैसर्गिक व कृत्रिम स्थळांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार ७१ स्थळे निश्चित करण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त पीओपी मूर्तींचे विघटन योग्य पद्धतीने होण्यासाठी अमोनिअम कार्बोनेट पावडरचे वाटप विभागीय स्तरावर केले जात आहे. (List of artificial water tank natural places for ganpati visarjan announced by NMC Nashik Latest Marathi News)

७१ विसर्जन स्थळांमध्ये ४३ कृत्रिम तलाव, २९ पारंपरिक नैसर्गिक स्थळांचा समावेश आहे.कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच जल्लोषात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात नदीप्रदूषण होवू नये यासाठी कृत्रिम व नैसर्गिक स्थळांची निश्चिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर गणेशमूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या गणेश विसर्जन स्थळांवर गणेशमूर्ती आणि निर्माल्य दान करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

त्यासाठी सामाजिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने महापालिकेकडून विसर्जनस्थळी मूर्ती संकलन केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. पाच, सात दिवसांच्या मूर्तींचे विसर्जनासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळे उपलब्ध असतील. कृत्रीम विसर्जन स्थळे हे फक्त दहाव्या दिवसाच्या विसर्जनाकरताच उपलब्ध राहणार आहे.

विभागनिहाय पारंपरिक नैसर्गिक स्थळे-

नाशिक पूर्व- लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ परिसर, नंदिनी- गोदावरी संगम, नाशिक रोड- दसक घाट, चेहेडी गाव दारणा नदी, देवळाली गाव, विहीतगाव, वडनेर गाव (वालदेवी नदी), पंचवटी- म्हसरूळ सिता सरोवर, नांदूर मानूर, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड परिसर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा, नवीन नाशिक - पिंपळगाव खांब वालदेवी घाट, नाशिक पश्चिम- यशवंत महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, गाडगे महाराज धर्मशाळा, टाळकुटेश्वर पटांगण, सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमान घाट, सातपूर- गंगापूर धबधबा, गंगापूर अमरधाम, सोमेश्वर, चांदशी पूल, मते नर्सरी.

विभागनिहाय कृत्रिम तलाव-

नाशिक पूर्व- लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ, रामदास स्वामी नगर लेन १, नंदिनी गोदावरी संगम, साईनाथनगर चौफुली, डीजीपीनगर गणपती मंदिराजवळ, शारदा शाळेसमोर राणेनगर, कलानगर चौक राजसारथी, नाशिक रोड- नारायण बापू चौक, चेहेडी ट्रक टर्मिनल, निसर्गोपचार केंद्र जयभवानी रोड, शिखरेवाडी ग्राउंड, गाडेकर मळा, मनपा शाळा क्रमांक १२५ मैदान, राजराजेश्वरी चौक, के. एन. केला शाळेमागील प्रस्तावित भाजी मार्केट. पंचवटी- राजमाता मंगल कार्यालय, गोरक्षनगर, आरटीओ कार्यालय पेठ रोड, कोणार्कनगर, प्रमोद महाजन उद्यान, रामवाडी जॉगिंग ट्रॅक शेजारी, नवीन नाशिक- गोविंद नगर जिजाऊ वाचनालय,

राजे छत्रपती व्यायाम शाळेजवळ जुने सिडको, पवननगर जलकुंभ, राजे संभाजी स्टेडिअम, मीनाताई ठाकरे शाळा कामटवाडा, डे केअर शाळा राजीवनगर, राजे संभाजी महाराज व्यायाम शाळेजवळ कर्मयोगीनगर, नाशिक पश्चिम- चोपडा लॉन्स पूल गोदापार्क, चव्हाण कॉलनी परीची बाग, फॉरेस्ट नर्सरी गंगापूर रोड, बॅडमिंटन हॉल येवलेकर मळा, दोंदे पूल उंटवाडी रोड, महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, लायन्स क्लब पंडित कॉलनी, शीतलादेवी टाळकुटेश्वर मंदिर, सातपूर- पाइपलाइन रोड रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ, शिवाजीनगर धर्माजी कॉलनी, अशोकनगर पोलिस चौकी, नंदिनी नासर्डी नदी पूल सातपूर अंबड लिंक रोड, नंदिनी नासर्डी नदी पूल आयटीआय पूल, शिवाजीनगर पाझर तलाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT