Missing case solved esakal
नाशिक

...अन्‌ चिमुरडी सुखरूप पोहोचली आधाराश्रमात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शाळेत गेेलेली इयत्ता तिसरीतील चिमुरडी शाळा सुटल्यावरही इतर मुलींबरोबर परतली नाही. एवढेच नव्हे, तर रात्री उशीरापर्यंत तिचा थांगपत्ता न लागल्याने आधाराश्रमातील सर्वच जण चिंतेत पडले. अखेर रात्री उशीरा दोन जागृत युवकांनी तिला सुखरूप पोहोचल्यावर पोलिसांसह आधाराश्रमातील सर्वांचाच जीव भांड्यात पडला. (little girl reached shelter safely helped by police nashik Latest Marathi News)

घारपुरे घाटात आधाराश्रम असून, तेथे समाजाने टाकून दिलेल्या निराधार, निराश्रीत मुलींची निवासासह शिक्षणाची व्यवस्था समाजधुरिणांच्या माध्यमातून व शासनाच्या सहकार्याने करण्यात आली आहे. याच ठिकाणी इयत्ता तिसरीत शिक्षण घेणारी प्रिया (नाव बदलले आहे) इतर मुलींबरोबर राहते.

शनिवारी सकाळी ती तिच्या इतर नऊ मुलींबरोबर टिळक पथ सिंग्नलजवळील सरस्वती विद्यालयात पोचली. दुपारी शाळा सुटल्यावर संबंधित व्हॅनचालकाच्या लक्षात न आल्याने दहापैकी नऊच मुली व्हॅनमध्ये बसल्या.

मात्र, काही कारणाने प्रिया व्हॅनमध्ये बसलीच नाही. गर्दीची वेळ असल्याने ही बाब व्हॅनचालकाच्या लक्षात आली नाही. मात्र, व्हॅन आधाराश्रमात पोहोचल्यावर संबंधितांच्या दहापैकी एक मुलगी कमी असल्याचे लक्षात आले.

ही बाब सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही तपासण्यात आल्यावर एक मुलगी कमी असल्याचे सर्वांच्याच लक्षात आले. अन्‌ सर्वजण चिंतेत पडले. याबाबत सरकावाडा पोलिसांत तक्रार दिल्यावर पोलिसांचीही धावपळ उडाली. सर्वत्र शोध घेऊनही संबंधित मुलगी मिळाली नाही.

मुलगी सापडली

दिल्ली दरवाजा परिसरात अवतारसिंग पनफेर यांचे प्रभूज ॲथनिक (पूर्वीचे पंजाब कलेक्शन) रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास येथील कर्मचाऱ्यांची दुकान बंद करण्याची लगबग सुरू असतानाच त्यांना दुकानाच्या ओट्यावर एक मुलगी रडत असलेली दिसून आली.

काही वेळापूर्वीच पोलिस व अन्य यंत्रणांनी आवाहन केल्याने संबंधितांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर दुकानात काम करणारे सतीश तुपे व विकास शिंदे यांनी संबंधित मुलीला घेऊन घारपुरे घाटातील आधाराश्रम गाठले. तेव्हा सर्वांचाच जीव भांड्यांत पडला. त्यानंतर ही बाब सरकारवाडा पोलिसांनाही कळविण्यात आली. ड्यूटीनंतर रात्री अकरापर्यंत या मुलीला सुखरूप पोहोचविणाऱ्या या दोन युवकांचे पोलिसांसह आधाराश्रमातील सर्वांनीच कौतुक केले.

"सतीश तुपे व विकास शिंदे या युवकांनी समाजाभिमुख काम केले आहे. त्यांचा यथोचित सत्कार व्हावा. जेणेकरून युवकांना अशी कामे करण्यास प्रोत्साहन मिळेल."

-अवतारसिंग पनफेर, संचालक, प्रभूज ॲथनिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

Safe Investment : FD-RD, म्युच्युअल फंड्स की सोनं? कुठे किती नफा, कुठे किती धोका? गुंतवणूक करण्याआधी हे गणित नक्की समजून घ्या!

रिलीजला महिना झाला अन् शशांक आणि सायली संजीवच्या कैरी सिनेमाची ओटीटीवर होणार एंट्री ! कधी आणि कुठे पाहाल ?

आता फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार गाडी; Suzuki e-Access ची धमाकेदार एन्ट्री, 95 किमी रेंजसह परवडणारी किंमत

Amravati Municipal Election 2026 : अमरावतीत 'या' तीन प्रभागात चुरशीची लढत, आमदार राणांसह मुख्यमंत्री फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

SCROLL FOR NEXT