LLB Admission esakal
नाशिक

LLB Admission : LLBच्‍या प्रवेशप्रक्रियेला सुरवात; 5 वर्षांच्‍या अभ्यासक्रमास ऑप्‍शन फार्मची या तारखेपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

Nashik LLB Admission : राज्‍य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.

याअंतर्गत सीईटी परीक्षेतील कामगिरीच्‍या आधारे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशप्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते आहे. (llb admission option form for 5 year course is due tomorrow nashik news)

पदवीनंतर तीन वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमाच्‍या नोंदणीची मुदत सोमवार (ता. ३)पर्यंत होती.

अधिकाधिक विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी उपलब्‍ध व्‍हावी, यासाठी १० जुलैपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ दिलेली आहे. यानंतर कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नसून, विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत नोंदणी करून पुढील प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

दरम्‍यान, ई-स्‍क्रूटिनीच्‍या माध्यमातून कागदपत्रे पडताळणीसाठी १२ जुलैपर्यंत मुदत असणार आहे. यानंतर प्रवेशाची पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

विधी शाखेतील एलएलबी या पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशप्रक्रियेला गती आली आहे. पदवीनंतर तीन वर्षे कालावधीच्‍या अभ्यासक्रमाच्‍या नोंदणीला मुदतवाढ दिली असून, विद्यार्थी १० जुलैपर्यंत नोंदणी करू शकतील.

तर बारावीनंतरच्‍या पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबीच्‍या पहिल्‍या कॅप राउंडच्‍या नोंदणीची मुदत गुरुवार (ता. ६) पर्यंत दिलेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एलएलबी (५ वर्षे)च्‍या तीन प्रवेश फेऱ्या

एलएलबी (५ वर्षे) अभ्यासक्रमाच्‍या तीन प्रवेश फेऱ्या होणार आहे. पहिल्‍या कॅप राउंडमध्ये ऑप्‍शन फॉर्म भरण्यासाठी गुरुवार (ता. ६)पर्यंत मुदत असणार आहे. शुक्रवारी (ता. ७) पहिली निवडयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ८ ते १२ जुलैदरम्‍यान मुदत असेल. यानंतर दुसरी निवडयादी १४ जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १५ ते १८ जुलै अशी मुदत असेल. जुलैच्‍या अंतिम टप्प्‍यात तिसऱ्या कॅप राउंडची प्रक्रिया पार पडणार आहे.

अभियांत्रिकीच्‍या नोंदणीला शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

एमएचटी-सीईटी परीक्षा दिलेल्‍या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशासाठी नोंदणी करण्यास मुदतवाढ दिलेली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता. ७)पर्यंत नोंदणी करता येईल.

तर शनिवार (ता. ८)पर्यंत कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर गुणवत्तायादी प्रसिद्धी व कॅप राउंडचे सविस्‍तर वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT