नाशिक : रखडलेल्या कामांमुळे स्थानिकांना मनस्ताप SAKAL
नाशिक

नाशिक : रखडलेल्या कामांमुळे स्थानिकांना मनस्ताप

रामकुंडापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : गंगाघाटावरील रामकुंडाकडे जाणाऱ्या सरदार चौक ते रामकुंड या रस्त्याचे व गटारीकरण खोलीचे काम दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. त्यामुळे धार्मिक विधीसाठी शहरात आलेल्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहराच्या विविध भागात सध्या स्मार्टसिटीअंतर्गत कामे सुरू आहेत. यात गंगाघाटावरील पावसाळी गटारींच्या कामाचाही समावेश आहे. परंतु, सरदार चौक ते रामकुंड परिसरातील खडक अतिशय कठीण असल्याने रस्ता फोडण्यास जवळपास वर्षभराचा कालावधी लागला.

सध्या गटारीकरणाचे काम पूर्ण झालेले असलेतरी त्यावर अद्यापही काँक्रिटीकरण न केल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गोदावरी व रामकुंडाचे धार्मिक महत्त्व मोठे असल्याने या भागात स्थानिकांसह परराज्यातील भाविकांचा वर्षभर मोठा राबता असतो. मात्र, हे काम रखडल्याने भाविकांच्या वाहनांना रामकुंडापर्यंत पोचण्यासाठी अक्षरश आट्यापाट्या खेळत वाहने हाकावी लागतात.

त्यामुळे वाहनधारकांसह पायी चालणाऱ्यांनाही जीव मुठीत धरून चालावे लागते. गत आठवड्यात आलेल्या पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला होता. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडले. याबाबत स्मार्टीसिटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळत नसल्याचे अनेकांनी सांगितले. हे काम त्वरित पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा स्थानिक पुरोहित, परिसरातील व्यावसायिक व रहिवाशांनी केली आहे. त्यासाठी निवेदनही दिले, परंतु प्रतिसाद नसल्याचा अनुभव आहे.

फरशांचे काम मात्र जोमात

गोदाघाटावरील नदीपात्रालगत स्मार्टसिटीअंतर्गत फरशा बसविण्याचे काम पावसाळ्याच्या सुरवातीपासून सुरू आहे. मध्यंतरी गोदेला आलेल्या छोट्या पुरात हे काम मोठ्या स्वरूपात उद्‌ध्वस्त झाले होते. विशेष म्हणजे हा महापूर नव्हे तर रूटीन पूर होता. त्यातही या कामाने टिकाव धरला नाही. महापुरात या फरशा कशा टिकाव धरणार, असा प्रश्‍न आहे. जी कामे टिकणार नाहीत, असे सर्वांना कळते, तर अशी कामे सुचविणारे व त्यासाठी जोरदार पाठपुरावा करणाऱ्यांनाही समजत नसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : लक्ष्मण जगताप यांच्यामुळेच पिंपरी चिंचवडचा विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवलं!

शिक्षण विभागाचा अफलातून निर्णय! मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आता शिक्षक नोडल अधिकारी; नेमके काय आहे प्रकरण..

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! भाजप उमेदवाराला घरातच कोंडलं

Box Office: 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम'ची पहिल्या दिवशीची कमाई किती? मराठी शाळा प्रेक्षकांना भावली!

RO-KO ला अडवणं आता अवघड! २०२६ मध्ये विराट कोहली, रोहित शर्मा किती वन डे सामने खेळणार? कोणत्या प्रतिस्पर्धींना भिडणार?

SCROLL FOR NEXT