electricity cunsumption.jpg 
नाशिक

लॉकडाऊनमुळे विजेच्या मागणीत कमालीची घट...औद्योगिक क्षेत्र ठप्प असल्याचा मोठा परिणाम

सकाळवृत्तसेवा

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत असताना कोरोनाचे संकट येऊन लॉकडाउन जाहीर केल्याने विजेच्या मागणीत जिल्ह्यात कमालीची घट झाली आहे. राज्यात 21 हजार मेगावॉट विजेची दैनंदिन गरज 15 हजार मेगावॉटपर्यंत आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरू झाल्याने येत्या काळात विजेची मागणी पूर्वपदावर येण्याची शक्‍यता निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोठ्या प्रमाणात विजेची घट
दैनंदिन गरजांमध्ये वीज हा महत्त्वाचा घटक मानला जातो. आतापर्यंत विजेची मागणी कमी झाली, असे कधी ऐकिवात नव्हते. परंतु लॉकडाउनमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकला एप्रिलमध्ये 40 टक्‍क्‍यांनी विजेच्या मागणीत घट झाली. सर्वाधिक वीज व्यवसायासाठी लागते. संपूर्ण व्यवसाय बंद असल्याने मागणी एक ते दोन टक्‍क्‍यांवर आली आहे. औद्योगिक वसाहतीमधील सहा हजारांहून अधिक कारखाने बंद असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात विजेची घट नोंदविली गेली.

वीजपंपांचा वापर मोठ्या प्रमाणात

"लॉकडाउन'मुळे नागरिक घरांमध्येच बसून असल्याने टीव्ही, इस्त्री, पंखे, एसी, संगणक, मोबाईल चार्जिंग, फ्रीज, वॉशिंग मशिन आदी साहित्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. या काळात शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसले जाते. त्यासाठी वीजपंपांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्वाधिक वीज खेचणारे साधन असल्याने शेती क्षेत्रात विजेचा वापर वाढल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कमी झालेला विजेचा वापर
- शहर व जिल्ह्यात विजेची मागणी ः 1800-2000 मेगावॉट
- विजेचा कमी झालेला सरासरी वापर ः 40 टक्के
- घरगुती 250, औद्योगिक 300 तर, शेतीसाठी 450 मेगावॉट विजेची मागणी


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुणे हादरले ! उच्चभ्रू सोसायटीत अल्पवयीन गतिमंद मुलीवर तीन नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार

Gudi Padwa 2026: गुढीसाठी साडी निवडताना करू नका 'या' चुका! जाणून घ्या कोणते रंग ठरतात शुभ-अशुभ

Latest Marathi News Live Update : मुंबईतील चारकोपमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी रांगा

Ancient Temple Mystery : खोदकाम सुरू असताना अचानक बाहेर आले प्राचीन मूर्तींचे अवशेष; ऋषिकेशच्या 'या' मंदिराचा विस्मयकारक इतिहास समोर, मूर्ती नेमकी कोणाची?

आधी हिंदू मुलीशी लग्न, धर्मांतर करुन युट्यूबर म्हणतो, 'पुरुषांची नजर मला माहिती, बुरखा घालणं गरजेचं'

SCROLL FOR NEXT