Hexagon Company esakal
नाशिक

Nashik News: 'हॅग्जागॉन’च्या वेस्टजमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; माजी सरपंचांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा

लखमापूर : महसूल विभाग व ग्रामपंचायतीची परवानगी न घेता येथे हॅग्जागॉन कंपनी सुरू केली आहे.

या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच ज्योती विजय देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Loss of farmers due to Haxagon wastes Complaint of former sarpanch to district collector Nashik News)

निवेदनात म्हटले आहे, की लखमापूर येथील गट क्रमांक ९२ व ४४७ या मिळकती हॅग्जागॉन कंपनीने घेतल्या आहेत.

कंपनीने गट क्रमांक ९२ ची कृषिक/अकृषिक बिनशेती परवानगी घेतलेली नसून २५ ते ३० वर्षांपासून महसूल विभाग व ग्रामपंचायतीची परवानगी न घेता अनधिकृ बांधकाम करून कंपनी सुरू केली आहे.

कामगार कायद्यांचे पालन न करता कमी पगार देऊन कंपनी कामगारांकडून मोठ्या प्रमाणावर कामे करून घेत आहे. कामगारांची माहिती ग्रामपंचायतीला दिली जात नाही. कामगारांच्या आरोग्याबाबत उपाययोजना केल्या जात नाहीत

. कंपनीतून निघणाऱ्या वेस्टजमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ही कंपनी लखमापूर ग्रामपंचायत हद्दीत असून, कंपनीविरोधात ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे.

कंपनीवर कारवाई करण्याचा ठरावही ग्रामसभेत केला आहे. मात्र, ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच ठरावानुसार काहीही कार्यवाही न करता कंपनीच्या बेकायदेशीर कामास मदत करीत आहेत.

ज्योती देशमुख यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कामगार आयुक्त, दिंडोरी प्रांताधिकारी, तहसीलदारांकडे निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.

या आहेत मागण्या

गट क्रमांक ९२ वरील काम तातडीने बंद करण्यात यावे, कामगार कायद्यांचे पालन करीत नसल्याने कंपनीची परवानगी तत्काळ रद्द करावी, कंपनीच्या बेकायदेशीर कामास मदत करणाऱ्या ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंचांवर मनमानी कारभाराबाबत कारवाई करावी, कंपनीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी किंवा कंपनी तातडीने बंद करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

Shraddha Chopde: 'ज्युदोच्या मॅट'वर शेतकरी कन्येचा सुवर्ण हुंकार! महाराष्ट्राची कन्या श्रद्धा चोपडे पदक जिंकण्यासाठी ग्लासगोला रवाना

Gang Rivalry Foiled: कृष्णा आंदेकरवरील गोळीबाराचा कट उधळला; नंदुरबारला जाताना पोलिस व्हॅनवर हल्ल्याची होती योजना

Shirur Temple Robbery: शिरूर जैन मंदिर दरोडा प्रकरणी तिघांना २५ महिन्यांचा कठोर कारावास; भाविकांत समाधान

SCROLL FOR NEXT