NMC News  esakal
नाशिक

Nashik News : लेखा विभागाने दोष मान्य केल्यानंतर कर्मचाऱ्यांचे नुकसान थांबले

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक अदा करण्यासाठी लेखा विभागाकडून तयार करण्यात आलेल्या संगणक प्रणालीमध्ये दोष आढळून आला. या माध्यमातून जवळपास एक कोटी ८५ लाख रुपयांचे नुकसान होण्याची नामुष्की मात्र सीटू संघटनेच्या प्रयत्नांमुळे टळली. (Losses to employees stopped after accounting department admitted fault Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. वाढीव वेतन आयोगाप्रमाणे मासिक वेतन प्राप्त होत असले तरी कर्मचाऱ्यांनी फरकाची रक्कम देण्याची मागणी केली होती. त्यानुसार दिवाळीपूर्वी फरकाचा पहिला हप्ता देण्याचे नियोजन करण्यात आले. एकूण पाच हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे. दिवाळीपूर्वी पहिला हप्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु लेखा विभागाने संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून वेतन देण्याचा निर्णय घेतला.

परंतु, या प्रणालीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. सीटू संघटनेतर्फे मुख्य लेखा अधिकाऱ्यांना त्रुटी दर्शविण्यात आल्या, मात्र दखल घेतली नाही. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनदेखील केले. सीटू संघटनेकडून महापालिका मुख्यालयासमोर निदर्शनेदेखील करण्यात आली. परंतु, तरीदेखील दखल घेतली गेली नाही. सीटू संघटनेकडून तज्ज्ञांच्या मदतीने प्रणालीतील दोष स्पष्ट करण्यात आले. लेखा विभागानेदेखील दोष मान्य केल्यानंतर ९९ कर्मचाऱ्यांचे एक कोटी ८५ लाख रुपयांचे नुकसान थांबले आहे.

सीटू संलग्न नाशिक महापालिका कामगार कर्मचारी संघटनेचे नेते व माजी नगरसेवक ॲड. तानाजी जायभावे यांनी यासंदर्भात प्रयत्न करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. मुख्य लेखाधिकारी नरेंद्र महाजन यांच्या आडमुठे धोरणामुळेच कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करून महापालिकेतून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी संघटनेचे नेते ॲड. जायभावे यांनी केली आहे. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा. त्याचप्रमाणे पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा, या मागण्यासाठी अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Robotic Surgery Hub : पुणे बनतेय नवे ‘रोबोटिक सर्जरी हब’

Fraud City Hub : नागपूर शहर बनतेय फसवणुकीचे हब; अकरा महिन्यांत घातला १४२ कोटींचा गंडा

Latest Marathi News Live Update : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात

Amravati Case : पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरीसोबत केले लग्न; पती, सासू-सासऱ्यांसह सात जणांविरुद्ध गुन्हा

19-minute viral video mystery: १९ मिनिटांचा व्हायरल व्हिडिओत काय? सोशल मीडियावर धुमाकूळ… शेवटी घडलं तरी काय?

SCROLL FOR NEXT