मनरेगा.jpg 
नाशिक

मनरेगातून जिल्ह्याला १३ हजार विहिरींची लॉटरी! 'असा' मिळणार लाभ; वाचा सविस्तर

संतोष विंचू

नाशिक : (येवला) लाल फितीच्या कारभारामुळे गेले दोन वर्ष मंजुरीअभावी बंद असलेल्या मनरेगाच्या विहिरींसाठी शासनाने निकष बदलून परवानगी दिली आहे. आता लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतींना विहिरी मंजूर होणार असल्याने जिल्ह्यातील एक हजार ३८५ ग्रामपंचायतींना सरासरी दहा विहिरी गृहीत धरल्या तरी १३ ते १४ हजार विहिरींची लॉटरी लागणार आहे. 

वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळणार

एक विहीर शेतकऱ्याला खोदणे म्हणजे बँकेचे उंबरठे झिजवणे निश्चित. सुमारे दोन ते तीन लाखांचा खर्च विहीर खोदण्यासाठी येतो. त्यामुळे मनरेगातून विहीर करण्यास शासनाने परवानगी दिली होती. मात्र, मागील दोन वर्षांपासून सर्व विहिरी मंजुरीच्या प्रक्रियेला स्थगिती दिल्याने अनेक शेतकरी अनुदानासह विहिरीचा लाभ मिळविण्याच्या प्रतीक्षेत होते. अखेर शासनाने लोकसंख्येच्या निकषात विहिरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या गावांना पाच ते २० पर्यंत विहिरी दर वर्षी मिळणार असल्याने अनेक वंचित शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 
 
...असे आहेत निकष 

अनुसूचित जाती-जमाती, अल्पभूधारक, खुला, दारिद्र्यरेषेखालील व उत्पन्न कमी असलेल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांनाही विहिरीचा लाभ मिळतो. त्यासाठी ०.६० हेक्टरपर्यंत जमीन शेतकऱ्याकडे असायला हवी. त्याशिवाय त्याच्या शेतात कोणतीही विहीर यापूर्वी खोदलेली नसावी. आजूबाजूला पाचशे फुटापर्यंत सार्वजनिक विहीर नसावी. शेतकरी जॉब कार्डधारक असायला पाहिजे, अशा अटी असून, एक लाख ९० हजार रुपये विविध सामग्रीसाठी, तर एक लाख दहा हजार रुपये मजुरीच्या बदल्यात अनुदान मंजूर मिळणार आहे. या तीन लाखांत हवी तशी विहीर होत असल्याने शेतकऱ्यांचा या विहिरीसाठी प्रतिसाद मोठा असतो. 

...असा मिळेल लाभ 

लोकसंख्येच्या नव्या निकषाने एक हजार ५०० पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावाला पाच, तीन हजारांपर्यंत लोकसंख्येला दहा, पाच हजारांपर्यंत १५, तर पाच हजारांच्या पुढे लोकसंख्या असेल तर २० विहिरींचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पूर्वी दोन-चार विहिरी मिळायच्या तेथेच आता दहा ते १२ विहिरींचा गावांना लाभ मिळणार आहे. 

निकष बदलल्याने गरीब व सर्वसाधारण शेतकऱ्यांचे हित साधले जाणार आहे. ग्रामपंचायतमध्ये मनरेगाचा गावाचा कृती आराखडा तयार करते. इच्छुक शेतकऱ्यांनी आपले नाव समाविष्ट करून घ्यावे. त्यानंतर पंचायत समितीकडे पुढील प्रक्रियेसाठी प्रस्ताव पाठवावा. - प्रवीण गायकवाड, सभापती, पंचायत समिती  

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT