Nandurmadhyameshwar 
नाशिक

नयनरम्य...'नांदूरमध्यमेश्‍वर'च्या जलाशयाला सौंदर्याचे कोंदण!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : एरवी पर्यटकांची वर्दळ आणि देशोदेशीच्या विविध पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे नेहमीच लक्ष वेधून घेणारा हा परिसर रिमझिम पाऊस आणि नयनरम्य पानथळामुळे अधिकच रम्य वाटू लागलाय... जणू निसर्गानेच पाणथळाला कमलपुष्पांचा साज चढविला असून, जलाशयाला त्यामुळे सौंदर्याचे कोंदण लाभले आहे.

यंदा फुलांचे प्रमाण १५ पटीने अधिक

‘महाराष्ट्राचे भरतपूर’ अशी ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्याच्या पानथळामध्ये सध्या कमळाची फुले बहरली आहेत. या सौंदर्यात भर घालण्यासाठी गोदावरी नदीच्या अथांग पात्रातील या लाल, पांढऱ्या फुलांवर जखाना पक्षी बसू लागल्याने येथील निसर्गसौंदर्य आणखीच खुलून दिसू लागले आहे. एकूणच अभयारण्याचे हे विलोभणीय रूप मन प्रसन्न करणारे आहे. जूनपासून साधारण ऑक्टोबरपर्यंत ही फुले टिकून राहतात. सध्या अभयारण्य बंद असल्याने पर्यटकांना हे निसर्गसौंदर्य लॉकडाउननंतरच बघावयास मिळणार आहे. मुख्यत्वे फ्लेमिंगोसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यात सध्या ही कमळाची फुलेच आकर्षण ठरत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांचे प्रमाण १५ पटीने अधिक असल्याचे वन विभागाने सांगितले.

जखाना पक्ष्याचे आवडते खाद्य म्हणजे कमळाचे फूल. त्यामुळे यंदा अभयारण्याच्या परिसरात हे पक्षीदेखील मोठ्या संख्येने दिसू लागले आहेत. हे पक्षी घरटी करून येथेच राहिल्यास पक्षीप्रेमींनाही हजारोंच्या संख्येने जखाना (कमळ पक्षी) पाहावयास मिळतील. - गंगाधर आघाव, पक्षीमित्र

लॉकडाउन असल्याने पर्यटकांना अभयारण्यातील कमळाची फुले पाहण्यासाठी अजूनही पक्षी अभयारण्य उघडण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. प्रशासनाकडून पक्षी अभयारण उघडण्याची परवानगी मिळाल्यानंतर पर्यटक, पर्यावरणप्रेमी व पक्षीप्रेमींसाठी अभयारण्य खुले होणार आहे. - अशोक काळे, वनपाल, नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्य 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT