Shobhabai Kalankar making cement stoves in Kumbharwada esakal
नाशिक

LPG Rates Hike : स्वयंपाकघरात पुन्हा अवतरल्या चुली; गॅस सिलिंडर महागाईने कोलमडले गृहिणींचे आर्थिक गणित

- दीपक खैरनार

अंबासन (जि. नाशिक) : गेली कित्येक वर्ष घराघरांतील चुलीवरील कुटुंबीयांचे पोट भरणाऱ्या कष्टकरी महिलांनी पै-पै जोडून गॅस सिलिंडर घेतला. चुलीच्या धुराड्यातील निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या आणि कामाचा पडणारा ताण थोडा सैल झाला.

मात्र आता कामाची चिंता, महागाईचा उडालेला भडका, गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमती यामुळे गावाकडील महिलांनी आपला मोर्चा पुन्हा चुलीकडे वळाल्याचे चित्र दिसू लागले आहे. गॅस सिलिंडरने गृहिणीचे बजेट कोलमडून पडल्याने स्वयंपाक घरात आता चुली अवतरत आहेत. (LPG Rates Hike Kitchen Stoves Gas Cylinders Inflation Housewives financial budget collapse nashik news)

गॅस सिलिंडर वापराचे सोयीचे असल्याने सर्वसाधारण व्यक्तीच्या घरातही गॅसचा वापर होऊ लागला आहे. मात्र या महागाईने चुलीवरही पाणी ओतले आहे. गॅस सिलिंडर परवडत नाही म्हणून कालबाह्य होत चाललेल्या चुली पुन्हा ग्रामीण भागात पेटू लागल्या आहेत.

गॅस सिलिंडरचे दिवसागणिक वाढतच चालले भाव यामुळे ग्रामीण भागातील गरिबांना गॅस सिलिंडर वापरणे आता डोईजड झाले आहे.

ग्रामीण भागात वृक्षतोडीवर नियंत्रण मिळावे व महिलांना चुलीपासून होणाऱ्या धुरापासून मुक्त करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उज्ज्वला योजना अमलात आणली. यासाठी उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आले.

अनेकांनी शंभर रुपयात पहिल्यांदाच गॅस सिलिंडर घेतले. मात्र त्यानंतर ते शोभेची वस्तू बनले आहे. आजच्या घडीला गॅसचे गगनाला भिडलेले भाव सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे असल्याने परत ग्रामीण भागात चुली पेटू लागल्या आहेत.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

सरपण मिळणे झाले मुश्कील

गॅस सिलिंडर परवडत नाहीत आणि सरपणही मिळत नाही. या दुहेरी संकटात सापडलेल्या महिलावर्ग जंगलातून चुलीला लागणाऱ्या सरपनासाठी जुगाड करीत आहेत. वनविभागाच्या राखीव हिरवीगार जंगलही बोडकी होत चालल्याने जंगलांची मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत चालली आहे. यामुळेच चुली पेटविण्यासाठी सरपण मिळणेही मुश्कील होऊन बसले आहे.

"पूर्वी आमच्याकडे मातीच्या चुलींची जास्त प्रमाणात मागणी होती. काळानुसार बदल झाला घरोघरी गॅस सिलिंडर आले. मात्र सिलिंडरचे भाव वाढत चालल्याने सिमेंटचा वापर करत तयार केलेल्या चुलीची मागणी पुन्हा वाढली आहे." - शोभाबाई कलंकार, कारागीर, अंबासन

"आम्ही पूर्वीपासून शेतात राहत असून चुलीसाठी लागणारे सरपण शोधण्याची गरज भेडसावत नव्हती. काळ बदलला आणि गॅस सिलिंडर घेतला. मात्र गगनाला भिडत चालले भाव, शेतीमालास मिळत असलेला भाव यामुळे सिलिंडर भरावे कसे हा प्रश्‍न असल्याने पुन्हा चूल पेटवावी लागत आहे."- यशोदाबाई आहिरे, रामतीर.

"गॅस सिलिंडर कसे वापरात हेही आम्हाला माहीत नव्हते. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन घेतले. हाताला काम मिळेल तेव्हाच दोन ते तीन वेळा भरून पाहिला. मात्र आता ते हजाराच्या घरात गेल्याने घेणे परवडत नसल्याने चुलीच बऱ्या वाटतात."- अंबिका माळी

"गॅस सिलिंडरचे दिवसागणिक वाढत असलेले भाव सर्वसामान्य न परवडणारे आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडून पडत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे."

- छाया सोनवणे, कजवाडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले

Bombay Stock Exchange Journey: वडाच्या झाडाखाली सुरूवात अन्...; भारताचा शेअर बाजार आशियाचा 'आर्थिक वाघ' कसा बनला?

Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT