Panchvati Panjrapol Goshala Nashik
Panchvati Panjrapol Goshala Nashik esakal
नाशिक

Nashik : नाशिकमधील लम्पीमुक्त पंचवटी पांजरापोळची गोशाळा

सकाळ वृत्तसेवा

बातमीदार : अक्षत दोरकुळकर

नाशिक : लम्पी चर्मरोगाने पशुपालकांच्या तोंडचा घास पळवला आहे, अशा वातावरणात येथील श्री नाशिक-पंचवटी पांजरपोळ संस्थेची गोशाळा ‘लम्पी’मुक्त आहे. गाईंची राखण्यात येत असलेली निगा हे त्यामागील कारण आहे, हे राज्यासाठी चांगले उदाहरण पुढे आले आहे.(Lumpy free Panchvati Panjrapol Goshala Nashik)

श्री नाशिक-पंचवटी पांजरपोळ गोशाळेतील सर्व गायींचे लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय विषाणूंचा शिरकाव रोखण्यासाठी गोशाळेत नियमित कडुनिंबाचा धूर केला जातो. विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी सर्व गायींना स्वच्छ पाण्याने स्नान घालण्यात येते. गोशाळेतील १४ शे ६३ पशूधनापैकी २६४ गायी दूध देणाऱ्या आहेत. त्यातील एकाही गायीला लम्पीचा प्रादुर्भाव होऊ शकलेला नाही.

सेंद्रीय पद्धतीच्या राष्ट्रीय आणि ईयू मानंकाद्वारे प्रमाणित सेंद्रीय दूधाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या महिन्यात पांजरपोळचे ६८ हजार ८७३ लिटर इतक्या दुधाचे उत्पादन झाले आहे. संस्थेतर्फे आर्थिकदृष्ट्या मागास वस्त्यांमधील बारा वर्षांपर्यंतच्या मुलांना शंभर मिलीलिटर दूधाचा समावेश असलेला सकस आहार मोफत दिला जातो.

१८७८ मध्ये स्थापन झालेल्या संस्थेतर्फे सामाजिक सामिलकीच्या भावनेतून भारतीय सैन्य कल्याण निधीसाठी २६ जानेवारी २०१८ पासून सेंद्रीय गाई दुधाच्या विक्रीवर लीटरला दहा पैसे आणि प्रमाणित गाई तुपाच्या विक्रीवर किलोला ५ रुपये योगदान दिले जात आहे. संस्थेच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने 'गोपाल रत्न' पुरस्काराने गौरवले आहे.

कडुनिंबाचे आयुर्वेदातील महत्त्व

० आयुर्वेदामध्ये कडुनिंबाला फार मोठे महत्त्व दिले आहे. कडुनिंबाची पानं खूप कडू असले तरी, त्यामध्ये अँटीपॅरासिटीक, अँटिबॅक्टेरियल, अँटीफंगलसारखे गुणधर्म असतात. देशात कडुनिंबाला ‘गावरान औषध’ म्हणतात

० भारतीय वेदांमध्ये कडुनिंब म्हणजे प्रत्येक आजारावरील औषध म्हणून उल्लेख केला जातो

० कडुनिंबाच्या पाला जाळण्यातून परिसर निर्जंतुक होतो

० कडुनिंब झाडांची पानांमध्ये व बियांमध्ये काही बहुउपयोगी घटक आढळून येतात. जसे ॲझेटार्क्टिन हा घटक परिणामकारक असून हा घटक किडींना जवळ न येऊ देता त्यांच्यामध्ये कायमचे अपंगत्व आणून त्यांना संपुष्टात आणण्याचे काम करते. जनावरांच्या विषाणू रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या घटकाचा उपयोग होतो

० कडुनिंबाचा सर्व आयुर्वेद ग्रंथामध्ये उल्लेख आहे. चरकसंहितेत तर कडुनिंबाला सर्व रोग निवारक अथवा अरिष्ट म्हटले आहे

० कडुलिंबाच्या पानात ‘अ’ जीवनसत्त्व असते

गाईचे दूध म्हणजे अमृत

गोषु प्रियम् अमृतं रक्षमाणा |

गाईचे दूध अमृत असून ते रोगापासून रक्षण करते. दूध हे आरोग्यवर्धक, रोगनाशक, रोगांपासून बचाव करणारे, ऊर्जा आणि शक्ती देणारे असल्याचे सांगितले जाते. केवळ शारीरिक बळच नाही तर बुद्धी वाढवते आणि बुद्धी देते असे सांगितले जाते.

आयुर्वेदातील “निघंटु” या ग्रंथात दुधाचे अमृत आणि पियुष यांची नावे दिली आहेत. अशा प्रकारे शास्त्रीय पुराव्यांवरून हे कळते की, जगात अमृत असेल तर ते दूध आहे. अमृत ​​नावाची कोणतीही काल्पनिक वस्तू नाही. दुधाला अमृताची उपमा भावनेतून अथवा काही धार्मिक विचारातून दिली गेली असे नाही. गुणांशिवाय एखाद्या गोष्टीची स्तुती करणे ही भारतीय परंपरा नाही. हे साधर्म्य केवळ

त्याच्या गुणधर्माच्या आधारे दुधाला देण्यात आले आहे. विविध ग्रंथांमध्ये दुधाचे गुणधर्म वर्णन केलेले आणि आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर उभे आहेत. चरक आदी चिकित्सा ग्रंथांमध्ये 'स्वादु शीतं मृदु स्निग्धं बहलं श्लक्ष्णपिच्छिलम् | गुरु मन्दं प्रसन्नं च गव्यं दशगुणं पयः|‘ असे वर्ण केले आहे. म्हणजेच गाईचे दूध चवदार, गोड, थंड, मऊ, दाट, गुळगुळीत, काहीसे जड, नाशवंत आणि शुद्ध असे दहा गुण त्यात आहेत.

ऋषी धन्वंतरी, हे प्राचीन भारतीय वैद्यक पद्धतीचे अभ्यासक म्हणतात की, गाईचे दूध हे सर्व परिस्थिती आणि रोगांमध्ये वापरण्यायोग्य अन्न आहे. त्यामुळे वात, पित्त, हृदयाचे आजार होत नाहीत. शिवाय दूध हे संपूर्ण अन्नपदार्थ आहे असे अथर्ववेदात लिहिले आहे. त्यात मानवी शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व घटक असतात, जे आपल्या शरीराला आवश्यक असतात.

पांजरपोळ संस्थेचे यंदाचे दुग्धोत्पादन

(आकडे लीटरमध्ये दर्शवतात)

महिना एकुण दिवसाला सरासरी

फेब्रुवारी ७५३१४.२५ २६८९.७५

मार्च ८२५०६ २६६१.५

एप्रिल ७९४७०.२५ २६४९

मे ७८०८८.५ २५१८

जून ७२०२२ २४००

जुलै ६९५५६.५ २२४३.७५

ऑगस्ट ६८८७३.५ २२९५.७५

"श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त हितेश जव्हेरी यांच्या उत्तम व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून गोशाळेचे कामकाज चालते. गोशाळेतील पशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकांच्या प्रयत्नामुळे लम्पीमुक्त गोशाळा हे साध्य करता आले."

- डॉ. नीलेश शेलार, पांजरापोळ संस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT