luxury bus caught fire near vadhivrhe mumbai nashik highway nashik marathi 
नाशिक

दि बर्निंग बसचा थरार! मुंबई-नाशिक महामार्गावर धावत्या बसने घेतला पेट; बस पूर्णपणे खाक

पोपट गवांदे

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : मुंबई- नाशिक महामार्गावरील वाडीवऱ्हेच्या पुढे आठवा मैल शिवारात मंगळवारी (ता. १२) धावत्या लक्झरी बसमध्ये तांत्रिक शॉकसर्कीट झाले. यामुळे लक्झरी बसने (युपी ६५, इटी ०१०१) पेट घेतला.

दैवाने बसमध्ये केवळ दोनच प्रवासी

ही बस मुंबईहून उत्तर प्रदेशकडे जात होती. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. आगीत बस पूर्णपणे खाक झाली. सुदैवाने बसमध्ये केवळ दोनच प्रवासी प्रवास करीत होते. बसला मागच्या बाजूने आग लागताच चालकाने प्रसंगवधान राखत बस रस्त्याच्या बाजूला उभी करून बसमधून उड्या मारल्याने जीवितहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण वाहतूक शाखा व वाडीवऱ्हे पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बघ्यांची गर्दी बाजूला केली. अग्निशमन दलाचा बंब बोलावून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीत बस पूर्णपणे खाक झाली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT