Mahant Swami Aniket Shastri Deshpande esakal
नाशिक

केमिकल मुक्त व रसायनमुक्त पूजा हीच गणेशाला खरी वंदना : महंत देशपांडे

सकाळ वृत्तसेवा

"खरंतर कोणत्याही चांगल्या कामाची सुरवात गणेश पूजनाने केली जाते. कलेची देवता, चैतन्य, विद्या, ज्ञान, आरंभ, विज्ञान, गती, प्रगती, सुरवात, बुद्धिमत्ता, चातुर्य, सेवा, मार्गदर्शन या गोष्टी प्राप्त करण्यासाठी गणेशाची स्थापना केली जाते. आपले शरीरात सप्तचक्र आहेत. ज्याच्यावर आपले शरीर चालते त्याचा मूलाधार गणपती आहे. कोणत्याही चांगल्या कामाचे नेतृत्व व कार्य सिद्धी गणपती करीत असतो. धर्मशास्त्रानुसार गणेश उत्सवात सत्यनारायण विधी न करता ‘सत्यविनायक विधी’ संपन्न करावा." - महंत स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे

धर्मशास्त्रानुसार गणेश उत्सव हा दीड दिवसांचा अनुष्ठान आहे. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध लोक एकत्र यायला हवे आणि विचारांची देवाणघेवाण करून क्रांती व्हायला हवी, यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू केला होता. (Mahant Swami Aniket Shastri Deshpande marathi article on ganesh chaturthi festival 2022 nashik news)

धर्मशास्त्रानुसार प्राणप्रतिष्ठा विधी हा फक्त तीन गोष्टींचा होऊ शकतो. त्यामध्ये धातू (सोने चांदी पितळ लोखंड व अन्य) पाषाण (कोणत्याही प्रकारचा दगड) व मृत्तिका (माती पासून बनवलेल्या मुर्त्या) यांचीच प्राणप्रतिष्ठा होऊ शकते. बाकी पीओपी प्लास्टिक काच व अन्य निसर्गाला व समाज व्यवस्थेला धोकादायक असणाऱ्या वस्तूची प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही.

धर्मशास्त्रानुसार घातक व अपायकारक मानल्या अशा वस्तूंचा समावेश गणेशोत्सवात कदापि नसावा. याला विज्ञानाची मान्यता नाही.गणेश अथर्वशीर्षात सांगितले आहे की, त्वं ज्ञानमयो, विज्ञान मयोसी! जेथे ज्ञान, विज्ञान यांचा संगम होतो तेथे सात्त्विक गोष्टींना वस्तूंना विधी मार्गांना प्राधान्य द्यावे.

गणेशोत्सव काळात सर्वच लोक मंगलमय प्रार्थना करीत असतात. परंतु धार्मिक उत्सवांमध्ये काही मंडळे कर्ण कर्कश आवाजातील डीजे, पीओपीच्या अपायकारक मुर्त्या, प्लास्टिक सजावट आणि घातक विद्युत रोषणाई याने वायू प्रदूषण जलप्रदूषण ध्वनी प्रदूषण त्याचबरोबर वर्गणीच्या नावे होणारी लूट, केमिकल व घातक रसायनयुक्त पूजन सामग्री याला फाटा दिला पाहिजे.

लम्बोदरम् नमस्तुभ्यं सततं मोदक प्रियम् । या सुत्रप्रमाने गणपतीला नैवेद्य म्हणून गूळ खोबरे असलेला उकडीचा मोदक बनवायला हवा. व त्याचा नैवेद्य दाखवायला हवा. धर्मशास्त्रात धूपण समर्पयामी असे लिहिलेले आहे, अगरबत्ती समर्पयामी असे कुठेही लिहिलेले नाही.

त्यामुळे अगरबत्ती ऐवजी अस्सल कापूर जडीबुटी गुग्गुळ हवन सामग्री आदींचे ज्वलन करायला हवे. गणपतीला २१ पत्र्या वाहिल्या जातात त्या २१ पत्रांची लागवड घरातील कुंड्यांमध्ये अथवा अंगणातील बगीच्या मध्ये करायला हवी. यामुळे पर्यावरण संवर्धन होऊ शकते.

गणपतीच्या पत्नी रिद्धी व सिद्धी त्याचप्रमाणे शुभ व लाभ ही पुत्र आहेत. शिवपार्वती हे आई-वडील आहेत तर तपश्चर्या व कर्म हे सासू-सासरे आहेत. याचाच संगम म्हणजे गणेश परिवार होय. सध्या कलियुग आहे, या कलियुगानुसार धूम्रवर्ण या गणपतीचे प्रमाण पूजनासाठी शास्त्र मान्य आहे.

धर्मशास्त्रात युगानुसार गणेश पूजन व वर्णानुसार गणेश पूजन सांगितले आहे. म्हणून या मंगल सोहळ्याची मंगल सुरवात सर्वांनीच निसर्गपूजक व धर्मशास्त्राचा अभ्यास करून केल्यास खऱ्या अर्थाने गणेश उत्सव सत्कारणी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT