Council officials along with organizer BJP leader Dinkar Patil while inspecting the preparations for the All India Mahanubhava Samelan to be held here from December 20. esakal
नाशिक

Mahanubhav Sammelan: महानुभाव पंथाचे 20 पासून गुजरातेत संमेलन! श्रीमद् ‌भगवद्‌गीता जयंती महोत्सव

देशभरातून पाच लाख भाविकांची उपस्थिती असणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अखिल भारतीय महानुभाव संमेलन तथा श्रीमद् ‌भगवद्‌गीता जयंती महोत्सव यंदा गुजरातमधील वाळविहीर (ता. कपराडा, जि. बलसाड) येथे होत आहे.

२० ते २२ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून, संमेलनाचे आयोजक भारतीय जनता पक्षाचे नेते व नाशिकचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी तयारीचा आढावा घेत पाहणी केली.

दरम्यान, संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रण देण्यात आले आहे. (Mahanubhav Sammelan in Gujarat from 20 Shrimad Bhagavad Gita Jayanti Festival nashik)

या तीनदिवसीय कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह देशभरातून सुमारे पाच लाख नागरिक उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा गुजरातमधील भडोच येथील परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांचा वाडा हा महानुभाव पंथियांसाठी दर्शनासाठी खुला व्हावा, अतिदुर्गम भागात पालघर, बलसाड, डांग, तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा या आदिवासी भागात महानुभाव पंथाच्या अनुयायींना धर्मपंथ प्रचार-प्रचारासाठी बळ मिळावे, महानुभाव पंथ आणखी मोठ्या प्रमाणात वाढावा हा आहे.

संमेलनासाठी भव्य मंडप डोम उभारण्यात आला असून, येणाऱ्या भक्तांची राहण्याची, देवपूजेची, भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

पाहणीप्रसंगी राजेंद्र जायभावे, भागवताचार्य महंत चिरडेबाबा, महंत कृष्णराजबाबा मराठे, महंत वाल्हेराज बाबा, सायराजबाबा शास्त्री यांच्यासह भाविक उपस्थित होते.

आढाव्यानंतर दिनकर पाटील म्हणाले, की अखिल भारतीय महानुभाव संमेलन व श्रीमद् ‌भगवद्‌गीता जयंती महोत्सव वाळविहीर (ता. कपराडा, जि. बलसाड) येथे होत आहे.

कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवार, भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, अखिल भारतीय धर्मजागरण मंचाचे प्रमुख शरदराव ढोले, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ आदींसह गुजरातमधील खासदार, आमदार व मंत्रिगण उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाच्या यशस्वितेसाठी मुख्य आयोजक दिनकर पाटील, गुजरातचे आमदार जितूभाई चौधरी, नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप, विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, दत्ता गायकवाड, प्रकाशशेठ ननावरे, राजेंद्र जायभावे आदींसह सर्व आयोजक प्रयत्न करीत आहेत.

अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष सुकेणेकरबाबा शास्त्री, भागवताचार्य चिरडेबाबा, नाशिक जिल्हा मध्यवर्ती परिषदेचे अध्यक्ष कृष्णराजबाबा मराठे, कार्याध्यक्ष वाल्हेराजबाबा पातूरकर, डोळसकरबाबा शास्त्री, भाईदेव मुनी मानेकर, दत्तराजबाबा चिरडे, सायराजबाबा शास्त्री, कृष्णराजबाबा विद्वांस, अचलपूरकरबाबा, गोपीराजशास्त्री सुकेणेकर, दामोदरअण्णा पाथरे, महेंद्रमुनी कपाटे, बाळकृष्णदादा लोणारकर, बुद्धीसागरबाबा कपाटे आदी संत, महंत संमेलनासाठी प्रयत्नशील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG-U19 vs IND-U19: वैभव सूर्यवंशी गोलंदाजीत चमकला, धडाधड घेतल्या इंग्लंडच्या विकेट्स; रचला इतिहास, भारताची मजबूत पकड

Navi Mumbai: खारघरमध्ये ऐन पावसाळ्यात पाणीबाणी! रहिवाशांचा सिडकोविरोधात संताप; तीव्र आंदोलनाचा इशारा

WTC Standings : भारताची 'लॉर्ड्स'वर पराभवाच्या छायेत! जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत बसेल फटका

Pravin Gaikwad Case: गायकवाडांवरील हल्ल्यामागे भाजपचा हात? कॅबिनेट मंत्री गोत्यात?

घर साफ करताना तेजस्विनीला सापडलं वडिलांचं पत्र; पित्याच्या निधनानंतर त्यांनी घेतलेली उधारी द्यायला गेली तेव्हा त्या मित्राने...

SCROLL FOR NEXT