Namo Farmer maha sanman esakal
नाशिक

Maharashtra Agriculture News: शेतकऱ्यांना 1800 कोटींची लॉटरी! नमो शेतकरी महासन्मानचा दुसरा हप्ता वर्ग

Agriculture News : ही रक्कम फेब्रुवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

प्रशांत बैरागी

नामपूर : राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी १ हजार ७९३ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ही रक्कम फेब्रुवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. (Maharashtra Agriculture 1800 crore to farmers Second installment class of Namo Shetkari Maha Samman scheme marathi news)

राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यात ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजना सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या सोबतीला नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष ६ हजार याप्रमाणे रक्कम या योजनेतून देण्यात येत आहे.

या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.

एप्रिल ते जुलै २०२३ या पहिल्या हप्त्यामध्ये १ हजार ७२० कोटी रुपये निधीचे राज्यातील सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरण करण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२३ या दुसऱ्या हप्त्यासाठी आता १ हजार ७९२ कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून याचा लाभ राज्यातील जवळपास ९० लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.

१३ लाख शेतकरी वाढले...

राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा झाल्यानंतर कृषी विभागाने एक विशेष मोहीम राबवली होती. त्यानुसार योजनेसाठी पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची व त्रुटींची पूर्तता करण्यात आली, यामुळे राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे १३ लाख शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. (Latest Marathi News)

नमो महासन्मान योजनेच्या अटी

- राज्यातील शेतकरीच या योजनेसाठी पात्र

- अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.

- योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन, ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा

- अर्जदार शेतकऱ्याचे बँक खाते आधारकार्ड सोबत लिंक असणे गरजेचे.

- शासकीय सेवेतील व्यक्तीला योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

- आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याचा तपशील, जमिनीचे कागदपत्रे ७/१२ व ८ अ, पासपोर्ट आकाराचे फोटो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhavwadi Theft case : धक्कादायक! वैभववाडीत बंद बंगला फोडला, चक्क चोरट्यांनी दोन गॅस सिलिंडर चोरले

MI vs KKR सामन्यावर पावसाचं सावट? काय आहेत हवामान अंदाज अन् कसा राहिलाय दोन्ही संघाचा रेकॉर्ड?

Mobile Storage Tricks : सतत मोबाईलचं स्टोरेज फुल्ल होतंय? फ्रीमध्ये मिळेल जास्त स्पेस, एकदा वापरुन तर बघा 'ही' १ सोपी ट्रिक

Latest Marathi News Live Update : खरातशी निकट संबंध असलेल्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी – अनिल देशमुख

Horoscope : उद्या ३० मार्च! नवा आठवडा 'या' ३ राशीच्या लोकांसाठी धनलाभ योग आणणार; अडकलेले मोठे काम मार्गी लागणार, विदेश दौरा संभवतो

SCROLL FOR NEXT